एक्स्प्लोर

रुग्णालयांनी रुग्णांकडून डिपॉझिट घेतल्यास गुन्हा दाखल होणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

खाजगी रुग्णालयांनी रुग्णांकडून डिपॉझिट घेणे हा अक्षम्य गुन्हा असून असे डिपॉझिट घेतल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

जालना : कोरोनाच्या संकटसमयी अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लूट केल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी डिपॉझिटची मागणी रुग्णालयांकडून सर्रासपणे केली जात असल्याचं निदर्शनास आलं होतं. यामुळे अनेक रुग्णांची अडचण होत होती. काहींना उपचार घेणेही कठीण जात होते. हीच गोष्ट लक्षात घेत खाजगी रुग्णालयांनी रुग्णांकडून डिपॉझिट घेतल्यास गुन्हा दाखल होणार असल्याची महत्वाची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना उपचार घेणे सोपं होणार आहे. 

जालना जिल्ह्यातील कोरोना संदर्भात राजेश टोपे यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलताना त्यांनी म्हटल की, राज्यभरात सर्वत्र कोरोनाच्या रुग्णांत झपाट्यानं वाढ होत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नाहीत. अशावेळी खाजगी रुग्णालयाकडे रुग्णांना जावं लागतंय. मात्र तिथेही रुग्णांकडून भरमसाठ डिपॉझिट आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयांनी रुग्णांकडून डिपॉझिट घेणे हा अक्षम्य गुन्हा असून असे डिपॉझिट घेतल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. या बाबत  जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार दिले असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

Mumbai, Pune Corona Crisis: मुंबई, पुण्यात कोरोनाची परिस्थिती बिकट! दोन्ही शहरात विक्रमी रुग्णसंख्येची नोंद

शक्य असल्यास अनावश्यक आरोग्य चाचण्या टाळाव्या- राजेश टोपे

कोरोना संशयित असलेल्या रुग्णांच्या अनेक चाचण्या केल्या जात आहेत. अनावश्यक आरोग्य चाचण्या शक्य असल्यास टाळल्या जाव्यात असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांना केलं आहे. आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा सर्रास वापर टाळण्याचं आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी 5 हजार वैद्यकीय अधिकारी 15 हजार नर्सेस उपलब्ध करुन देणार : अमित देशमुख

कोरोनाचा मोठ्या प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी घेतला आहे. यानुसार 5200 वैद्यकीय अधिकारी आणि 15 हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे, असं अमित देशमुख यांनी सांगितलं. राज्यातील शेवटच्या वर्षात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा येत्या 20 एप्रिलला संपणार आहे. या परीक्षेचा निकाल तातडीने लावून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pushpak Express Accident : अपघात नेमका कसा झाला? पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांची EXCLUSIVE माहितीPushpak Express Train Accident : रेल्वेने 11 जणांना चिरडलं, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंJalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Embed widget