कोरोनाचा सामना करण्यासाठी 5 हजार वैद्यकीय अधिकारी 15 हजार नर्सेस उपलब्ध करुन देणार : अमित देशमुख
कोरोनाच्या स्थितीत सध्या डॉक्टर आणि नर्सेसची कमतरता भासत आहे. अशावेळी 5200 वैद्यकीय अधिकारी आणि 15 हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणार असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.
![कोरोनाचा सामना करण्यासाठी 5 हजार वैद्यकीय अधिकारी 15 हजार नर्सेस उपलब्ध करुन देणार : अमित देशमुख Corona update, 5,000 medical officers and 15,000 nurses to provide in critical condition of corona says Amit Deshmukh कोरोनाचा सामना करण्यासाठी 5 हजार वैद्यकीय अधिकारी 15 हजार नर्सेस उपलब्ध करुन देणार : अमित देशमुख](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/2/2018/06/27104150/doctor.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर होताना दिसत आहे. कोरोनाचा मोठ्या प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी घेतला आहे. यानुसार 5200 वैद्यकीय अधिकारी आणि 15 हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे, असं अमित देशमुख यांनी सांगितलं.
राज्यातील शेवटच्या वर्षात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा येत्या 20 एप्रिलला संपणार आहे. या परीक्षेचा निकाल तातडीने लावून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली.
राज्यातील विविध नर्सिंग कॉलेजमधील जीएनएम आणि एएनएम हा अभ्यासक्रम आणि इंटर्नशीप पूर्ण झालेल्या 15 हजार नर्सेसच्या रजिस्ट्रेशनचे काम तातडीने पूर्ण करुन त्यांच्या सेवाही आरोग्यसेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नर्सेसेच्या सेवा त्या-त्या जिल्ह्यात कंत्राटी तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येतील. राज्यात विविध जिल्ह्यात आणि विशेषत: शहरी भागात कोविड परिस्थितीचा सामना करतांना वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे. या निर्णयामुळे डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत, असं अमित देशमुख यांनी सांगितलं.
राज्यात कोरोनाची दहशत, दिवसभरात 57 हजारहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद
डिपॉझिट घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचे आदेश- राजेश टोपे
राज्यभरात सर्वत्र कोरोनाच्या रुग्णांत झपाट्यानं वाढ होत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नाहीत. अशावेळी खाजगी रुग्णालयाकडे रुग्णांना जावं लागतंय. मात्र तिथेही रुग्णांकडून भरमसाठ डिपॉझिट आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयांनी रुग्णांकडून डिपॉझिट घेणे हा अक्षम्य गुन्हा असून असे डिपॉझिट घेतल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. या बाबत जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार दिले असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
EXCLUSIVE | कोरोना निर्बंधांची अंमलबजावणी कशी करणार?मुबंई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याशी बातचीत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)