एक्स्प्लोर

सरकार आणि व्यवस्था न्याय देत नसेल आत्महत्येशिवाय पर्याय नाही, MPSC उत्तीर्ण सोनाली भाजीभाकरेची उद्विग्न प्रतिक्रिया

कोरोना संकटाने अनेकांना उद्ध्वस्त केले आहे. मात्र अशा संकटात व्यवस्थेकडून देखील न्याय मिळत नसल्याने सोनालीसारखी अवस्था अनेक भावी अधिकाऱ्यांची बनली आहे.  

पंढरपूर :  सहा वर्षाच्या संघर्ष करून ती एमपीएससी परीक्षा पास झाली. नायब तहसिलदार म्हणून तिची निवड झाली.  सर्वत्र सत्कार झाले आणि देशात कोरोना आला. कोरोना काळात यात पहिल्यांदा वडील नंतर आई आणि शेवटी कर्ता मोठा भाऊ यांचा बळी गेला.  आर्थिक अडचणीची परिस्थिती असताना उपचारासाठी 20-22 लाखाचे कर्ज डोक्यावर झाले. संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले. आता जगायचे कसे हा प्रश्न समोर असताना अधिकारी म्हणून निवड होऊनही नियुक्ती मिळत नसल्याने आत्महत्येची एकच वाट समोर दिसत असल्याचे उद्विग्न मानसिकता सोलापूर जिल्ह्यातील कूर्डू येथील सोनाली भाजीभाकरेची  झाली आहे . 

कोरोना संकटाने अनेकांना उद्ध्वस्त केले आहे. मात्र अशा संकटात व्यवस्थेकडून देखील न्याय मिळत नसल्याने सोनालीसारखी अवस्था अनेक भावी अधिकाऱ्यांची बनली आहे.  याची सुरुवात स्वप्नील लोणकर या तरुणाने टोकाचे पाऊल उचलून केली असली तरी शासनाने आता मात्र याबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे बनले आहे.
 
 गेल्या वर्षी 19 जूनला नायब तहसीलदार म्हणून सोनाली उत्तीर्ण झाली म्हणून तिने हातातील खासगी नोकरी सोडली. आता आई वडील आणि मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर हे कुटुंब उघड्यावर आले आहे .  आज लहान भावासह सोनालीसमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे आहे.   19 जून 2020 रोजी हा निकाल लागला होता. त्यानंतर दोन महिन्यांत या नियुक्त्या होणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने त्या न केल्याने 9 सप्टेंबर 2020 च्या मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कचाट्यात सापडल्या.

5 मे रोजी 2021 सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यावर बाकी नियुक्त्या देण्याचा उल्लेख केला.मात्र, त्यानंतर दोन महिने उलटले तरी सरकारने त्यावर निर्णय न घेतल्याने या विद्यार्थ्यांची मानसिकता खूपच खराब झाली आहे . आता मात्र शासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि राज्यात स्वप्नील सारखी पुनरावृत्ती होऊ देऊ नये एवढीच अपेक्षा. 

संबंधित बातम्या :

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्यांचा एकच प्रश्न... परीक्षा कधी होणार?

स्वप्निलच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग, MPSCपरीक्षांसंदर्भात राज्य सरकार समिती गठित करणार

MNS : स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर मनसे आक्रमक, नवी मुंबई ते विधानभवन मनसैनिक चालत जाऊन सरकारचा निषेध करणार

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget