Shirdi Sansthan: शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पी. शिवशंकर यांची नियुक्ती
Shirdi Sai Sansthan : सनदी अधिकारी पी. शिवशंकर यांची शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे.
![Shirdi Sansthan: शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पी. शिवशंकर यांची नियुक्ती IAS officer P Shivshankar become CEO of Shri Saibaba Sansthan Trust Shirdi Maharashtra Shirdi Sansthan: शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पी. शिवशंकर यांची नियुक्ती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/cb05b95e05bf8babfa635798456fe7b81683040644316290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shirdi Sansthan: राज्य सरकारने मंगळवारी अनेक आयएएस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपुर शहरात वस्त्रोद्योग संचालक म्हणून कार्यरत असलेले पी. शिवशंकर यांची शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साई संस्थानच्या नवीन सीईओ म्हणून पी. शिवशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्पूर्वी शिर्डी साई संस्थानच्या सीईओ पदी भाग्यश्री बानाईत धिवरे या होत्या. बानाईत यांनी देखील नागपूर येथील रेशीम उद्योग संचालनालयात संचालक म्हणून काम पाहिले आहे. आज सायंकाळी पी. शिवशंकर यांच्या बदलीचा आदेश प्राप्त झाला आहे.
पी शिवशंकर हे 2011 च्या बॅचचे कॅडर आहेत. कोणत्याही कामकाजाला शिस्त आणि कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत वेगळी ओळख निर्माण करणे अशी पी. शिवशंकर यांची ओळख आहे. दरम्यान नागपूर येथील कामकाज आधी ते सोलापूर शहरात महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी बदलीसाठी अर्ज केल्याचे समजते. 'आपला महाराष्ट्रातील दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे आपण केडर बदलास पात्र आहेत. यासंदर्भातील अर्ज केंद्र सरकारला सादर केला आहे.' पी. शिवशंकर यांनी आंध्रप्रदेशातील टोबॅको बोर्डात बदलीसाठी अर्ज केला होता.'
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साई मंदिरात (Shirdi Sai baba) रोजच लाखो लोक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे शिर्डी साई मंदिर परिसरात नेहमीच भाविकांची वर्दळ असते. त्याचबरोबर अनेक भाविक दररोज साईचरणी दान करत असतात. शिर्डी संस्थानची देखरेख, कर्मचारी वर्ग, भाविकांची सुरक्षितता या सगळ्यासाठी शिर्डी संस्थांनद्वारे योग्य उपाययोजना केल्या जातात. त्यामुळे नेहमीच वाद उद्भवत असतात. त्यामुळे अनेकदा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून देख रेखीचे काम केले जाते.
जी श्रीकांत संभाजीनगर महापालिकेचे नवीन आयुक्त, अभिजित चौधरींची जीएसटी सहआयुक्तपदी बदली
गेल्या आठवड्यात झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर (IAS Officer Transfers ) आता राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढले आहे. छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिका (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) आयुक्त अभिजीत चौधरी (Abhijeet Chaudhary) यांच्यासह राज्यातील एकूण 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जीएसटी (GST) कार्यालयात कार्यरत असलेले जीएसटी सहआयुक्त जी श्रीकांत (G Srikanth) यांची संभाजीनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्त अभिजीत चौधरी यांची बदली झाली आहे. सोबतच राज्यातील इतर नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)