एक्स्प्लोर
सरकारने आंदोलनाला जागा न दिल्यास तुरुंगात उपोषण : अण्णा
पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्रालयाला पत्र पाठवूनही जागा मिळत नाही, असं अण्णांनी म्हटलं आहे.
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जनलोकपालसाठी राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. मात्र या आंदोलनासाठी सरकार जागा देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्रालयाला पत्र पाठवूनही जागा मिळत नाही, असं अण्णांनी म्हटलं आहे.
जनलोकपालच्या अंमलबजावणीसाठी अण्णा दिल्लीत 23 मार्चला शहिद दिनाच्या दिवशी आंदोलनाला सुरुवात करणार आहे. मात्र सरकारला पत्र पाठवूनही आंदोलनासाठी जागा दिलेली नाही. जागा न दिल्यास तुरुंगात उपोषण सुरु करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
आंदोलनाला कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नाही
दरम्यान, या आंदोलनात कोणत्याही राजकीय पक्षाचा सहभाग नसेल, शिवाय कोणत्या राजकीय पक्षाचा पाठिंबाही घेतला जाणार नाही, असं अण्णांनी स्पष्ट केलं आहे. सगळेच राजकीय पक्ष आपापल्या स्वार्थासाठी काम करतात, त्यामुळे कुणाचा पाठिंबा घेण्याचा संबंध नाही. हे जनतेचं आंदोलन असेल, असं अण्णा म्हणाले.
संबंधित बातम्या :
जनलोकपाल आंदोलनाची तयारी, अण्णांचा पाच राज्यांचा दौरा पूर्ण
या आंदोलनात मागण्या मान्य न झाल्यास प्राणाची आहुती : अण्णा हजारे
‘अण्णा हजारेंच्या तक्रारीचं काय झालं?’, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
लोकपालसाठी अण्णा पुन्हा मैदानात, 23 मार्चपासून दिल्लीत आंदोलन
मोदींनी लोकपाल कायदा कमकुवत केला : अण्णा हजारे
अण्णा पुन्हा मैदानात, देशव्यापी आंदोलनाची तारीख ठरली!
जनलोकपालसाठी अण्णा पुन्हा मैदानात, आंदोलनाची तारीख जाहीर
जनलोकपालसाठी अण्णा हजारेंनी पुन्हा रणशिंग फुंकलं!
अण्णा हजारे लोकपालसाठी पुन्हा मैदानात, आंदोलनाची घोषणा करणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement