एक्स्प्लोर
विजेच्या धक्क्याने शेताच्या बांधावरच पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू
शेताच्या बांधावरील तारेवर पाय पडला आणि शॉक लागून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू झाला.

सातारा : विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत पती, पत्नी आणि त्यांच्या 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील वर्णे गावातील हे कुटुंब होते. शेताच्या बांधावरील तारेवर पाय पडला आणि शॉक लागून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू झाला. सुरेश काळंगे, संगीता काळंगे आणि त्यांचा 16 वर्षीय मुलगा सर्वेश काळंगे अशी मृतांची नावं आहेत. हे कुटुंब घरी न आल्याने त्यांची शोधाशोध सुरु झाली, त्यानंतर ही दुर्दैवी घटना उघडकीस आली.
आणखी वाचा























