Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंच्या दिमतीला किती पोलिसांचा फौजफाटा आणि खर्च होतो तरी किती? सरकारचा जावई आहे का? मनसेची विचारणा
Gunaratna Sadavarte : सदावर्ते सरकारचा जावई आहे का? अशी विचारणा करत मनसेनं त्यांच्या तगड्या सुरक्षेवर होणाऱ्या खर्चाचा सुद्धा मुद्दा उपस्थित केला आहे.
Gunaratna Sadavarte : वकिल असूनही भडक विधाने आणि अंतरगीपणामुळे महाराष्ट्रात कायम चर्चेत असणारे गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं कर्तृत्व काय? अशी विचारणा केल्यानंतर मनसेकडूनही हल्लाबोल करण्यात आला आहे. सदावर्ते सरकारचा जावई आहे का? अशी विचारणा करत मनसेनं त्यांच्या तगड्या सुरक्षेवर होणाऱ्या खर्चाचा सुद्धा मुद्दा उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणाऱ्या सदावर्ते यांना त्यांच्या सुरक्षेवर होणाऱ्या खर्चावरून विचारताच थेट उत्तर देता आलं नाही. त्यांनी राज ठाकरेंनी टोलवरचे पैसे मोजावेत, सरकारकडे लक्ष देऊ नये अशी टीका केली. यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.
सदावर्तेंच्या दिमतीला तगडा पोलिस बंदोबस्त
नेहमी नाजूक आणि संवेदनशील मुद्यावर न्यायालयाचे दरवाजा ठोठावणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंच्या दिमतीला तब्बल 20 पोलिसांचा फौजफाटा आहे. यामध्ये 1 पीएसआय, 2 एएसआय, संरक्षणासाठी 4 जण आणि इतर 13 पोलिस शिपायांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे सदावर्ते सरकारचे जावई आहेत का? अशी विचारणा मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मिलिंद पांचाळ यांनी सदावर्तेंच्या सुरक्षेवर महिन्याला 30 ते 40 लाख खर्च होत असल्याचे म्हटले आहे. त्यांना फुकटचे का पोसत आहेत? जनतेचा पैसा कशासाठी? अशी विचारणा त्यांनी केली.
फडणवीस यांनी चावी दिल्यानंतर हा बाहुला बोलतो
यशवंत किल्लेदार यांनीही सदावर्तेंच्या सुरक्षेवरील खर्चावरून सरकारवर हल्लाबोल केला. 21 लाख खर्च करण्यासाठी काय योगदान? वेल्डिंग चष्मेवाल्याला सरकार का पोसलं जात आहे अशी विचारणा केली. योगेश चिल्ले फडणवीस यांनी चावी दिल्यानंतर हा बाहुला बोलतो, अशी टीका केली. त्यामुळे गांर्भियाने घ्यायची गरज नाही, असा टोला लगावला.
मराठा आरक्षणाविरोधात सदावर्ते यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर अंगणवाडी सेविकांनी केलेल्या संपाविरोधातही त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर अंगणवाडी सेविका संतापल्या होत्या. हे सगळीकडे ढवळाढवळ करत असल्याचा आरोप करत दलाल असल्याचा आरोप केला. एसटी बँकेत यांनी लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोपही सेविकांनी केला.
राज ठाकरेचं कर्तृत्व काय, पार्श्वभूमी काय?
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या सुरक्षेवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असून, ते काय सरकारचे जावई आहेत का? असा प्रश्न मनसेकडून उपस्थित करण्यात आला होता. यावर बोलताना ,'राज ठाकरे टोल नाक्याचा मालक झालाय का?, राज ठाकरेचं कर्तृत्व काय, पार्श्वभूमी काय' असे म्हणत सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. ते म्हणाले की, टोल नाक्यावर कॅमरे लावून किती पैसे मोजले जातात हे पाहण्यासाठी ते कोण आहेत. त्यांचा राज ठाकरे मालक झाला आहे का?, राज ठाकरेचं कर्तृत्व काय, राज ठाकरेची पार्श्वभूमी काय, त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावर किती पैसे मोजले जातात हे पाहावेत. त्यांनी सरकारला शहाणपण शिकवण्या एवढं आणि माझ्यावर टीका करणे एवढं ते मोठे नाहीत.
इतर महत्वाच्या बातम्या