मालक झालाय का..., राज ठाकरेचं कर्तृत्व काय, पार्श्वभूमी काय?; गुणरत्न सदावर्तेंचा सवाल
Gunaratna Sadavarte : राज ठाकरेंनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावर किती पैसे मोजले जातात हे पाहावेत.
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) प्रतिक्रिया देतांना वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या सुरक्षेवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असून, ते काय सरकारचे जावाई आहेत का? असा प्रश्न मनसेकडून उपस्थित करण्यात आला होता. यावर बोलताना ,'राज ठाकरे टोल नाक्याचा मालक झालाय का?, राज ठाकरेचं कर्तृत्व काय, पार्श्वभूमी काय' असे म्हणत सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
दरम्यान यावर बोलतांना सदावर्ते म्हणाले की, "राज ठाकरे काय जावाई आहेत का, टोल नाक्यावर कॅमरे लावून किती पैसे मोजले जातात हे पाहण्यासाठी ते कोण आहेत. त्यांचा राज ठाकरे काय त्यांचा मालक झाला आहेत का?, राज ठाकरेचं कर्तृत्व काय, राज ठाकरेची पार्श्वभूमी काय, असे बोलायला गेलो तर खूप बोलो शकतो. मात्र, आज ती वेळ नाही आणि आज तो विषय देखील नाही. त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावर किती पैसे मोजले जातात हे पाहावेत. त्यांनी सरकारला शहाणपण शिकवण्या एवढं आणि माझ्यावर टीका करणे एवढं ते मोठे नाहीत. राज ठाकरे आणि सदावर्ते आमने-सामने येऊ द्यात मग मी सांगतो. कोणीतरी छोटे-मोठे कार्यकर्ते बोलत असतील तर त्यावर मी वेळ रागावणार नसल्याचे म्हणत सदावर्ते यांनी खोचक टोला लगावला आहे.
गुलाल उधळण्यासाठी राजकीय निवडणूक होती का?
मनोज जरांगे यांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या, मागण्यांना संविधानक अधिकार लागत असतो. मराठा समाज समाजिक मागास नाही. खजूर खाऊन, दुध पिऊन आंदोलन होत नाही. ही काय राजकीय निवडणूक होती का? गुलाल उधळण्यासाठी, याला राजकीय स्वरूप देऊ नका असे आमचे म्हणणे आहेत. तसेच, दुध का दुध आणि पाणी का पाणी थोडं थांबा सर्वांच्या लक्षात येईल. मला काहीतरी मिळवण्यासाठी मी विरोध करत नाही, असेही सदावर्ते म्हणाले.
प्रत्येकाला कायद्याच्या चौकटीत राहावं लागेल.
ओबीसी बांधवांनी चिंता करण्याची गरज नाही. संविधानाचे पुस्तक आपल्या सोबत आहे. कोणत्याही समाजाशी गैर होणार नाही याची काळजी सरकारने घेणे आवश्यक आहे. रक्ताच्या नात्यातील लोकांना प्रमाणपत्रासाठी शपथपत्र देण्याची कायद्यात तरतूद आहे. यात नवीन काहीच नाही. न्यायालयाच्या निकालानंतर जे जे प्रतिबंध घालण्यात येतात त्याचे पालन करावचं लागतात. कोणी कितीही मोठा असला तरीही प्रत्येकाला कायद्याच्या चौकटीत राहावं लागेल, असेही सदावर्ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: