एक्स्प्लोर

"किती मर्डर पचवणार हे सरकार?"; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

Sindhudurg News : सुशात सिंह राजपूत, दिशा सालीयान यांच्या खुनाचे पुरावे दिले. मात्र कोणावरही कारवाई केली नाही. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव त्यामुळे अटक नाही, नारायण राणेंचा आरोप

Sindhudurg News : केंद्रीय मंत्री नायारण राणे यांनी सिंधुदुर्गात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडी सरकारला पुन्हा एकदा फैलावर घेतलं. ते म्हणाले की, "सुशात सिंह राजपूत, दिशा सालीयान यांच्या खुनाचे पुरावे दिले. मात्र कोणावरही कारवाई केली नाही. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव त्यामुळे अटक नाही." असा थेट आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरेंवर केला. पूजा चव्हाण प्रखरणी संजय राठोड यांनी पराक्रम केला. "किती मर्डर पचवणार हे सरकार?" , असं म्हणत नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. 

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सावंतवाडी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, भाजप महिला जिल्हाध्यक्ष सध्या तेरसे आणि पदाधिकारी उपस्थित होते. भाजपला यश मिळण्यासाठी सर्वांनी कामाला लागा. आपापसात मतभेद नको. काही झाले तरी आम्हाला यश मिळाले पाहिजे. त्या दृष्टीने मोर्चेबांधणी करा. असमार्गदर्शन यावेळी राणेंनी केलं.

सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा महत्त्वाचा तालुका आहे. या तालुक्यात आतातरी भाजपचा आमदार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याकडे आहेत. तरीदेखील दोन गोष्टी आपल्याला खटकतायेत. एक जिल्ह्यातील खासदार आणि सावंतवाडी, कुडाळ या मतदारसंघातील आमदार या दोन गोष्टी खटकत असल्याचं नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलून दाखवलं. यावेळी राणेंनी कार्यकर्त्यांना विनंती केली, पदासाठी भांडू नका वाद घालू नका, एकमेकांचा द्वेष करू नका. तालुका भाजपमय केल्यास तालुक्यातील बहुतेक पदं तुम्हाला मिळतील पदांसाठी भाडणाऱ्या कार्यकर्त्यांना राणेंनी टोला लगावला. यावेळी त्यांनी उद्या आमदारही तुमच्यातील एक होऊ शकतो, त्यासाठी पक्षाची बांधणी करणं आवश्यक असल्याचं नारायण राणेंनी सांगितलं.

"जे काही केलं ते नारायण राणे यांनी भाजपच्या माध्यमातून केलं"

"जिल्ह्यात जे काही केलं ते नारायण राणे यांनी भाजपच्या माध्यमातून केलं. रस्ते पाणी वीज शाळा अनेक गोष्टी मी आणल्या. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हापेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा मी चांगला बनवला. आता यांची सत्ता आहे. इथला आमदार शिवसेनेचा, पालकमंत्री शिवसेनेचा मात्र जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय. रस्त्यांना पैसे नाहीत.", असं नारायण राणे म्हणाले. 

"दोन हजार कोटीचा प्रकल्प म्हणून असे सांगून आमदार केसरकर लोकांची दिशाभूल करत आहे. हा प्रकल्प कोण आणतंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की, उद्योगमंत्री सुभाष देसाई की, आमदार दिपक केसरकर. कसला आमदार निवडून देताय? शेमड्या अशा शेलक्या शब्दांत केसरकरांवर राणेंनी टीका केली. मी विधानपरिषदेत होतो, तेव्हा हे गृहराज्यमंत्री होते. तेव्हा त्यांना प्रश्न विचारले बोलता आलं नाही. मी मंत्री असताना सभागृहात प्रत्येक जण अदबीनं मला विचारत होता. मी विधानसभा गदागदा हलवली. एक इतिहास निर्माण केला. मात्र आताच्या आमदाराला कोण विचारत नाही. मी कुठे आणि आताचे पिल्लू कुठे?", असे म्हणत त्यांनी आमदार दीपक केसरकर यांना चिमटा काढला.

"आपली दखल घ्यावी असं काम विधानसभेत केलं. या कोकणात सिंधुदुर्गात बुद्धिमानता कशी आहे? हे मी राज्यातील आमदार आणि मंत्र्यांना दाखवून दिलं. विधानसभेत कधीही उभा राहिलो तर कुणाची हिंमत नव्हती उलट विचारायची. विरोधी पक्षनेते असताना प्रत्येक मंत्री नमस्कार केल्याशिवाय हाऊसमध्ये जायचा नाही. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. सकाळी फोन यायचा नारायण राव कसे आहात, म्हणून विचारायचे. त्यामुळे आपली दखल घ्यावी असं काम विधानसभेत केलं. आणि आताचं पिल्लू बघा हे", अशी खोचक टीका राणेंनी आमदार दीपक केसरकरांवर केली. 

"शिवसेना हा थापाड्याचा पक्ष आहे. भारतीय जनतेच्या जगण्यात परिवर्तन आणलं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. जगाच्या पाठीवर अभिमान व्यक्त करावं, असं काम मोदींनी केलं. गरिबांना वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या.", असंही ते म्हणाले. 

आहे का? तुमच्या मुख्यमंत्र्यांत दम : केंद्रीय मंत्री नारायण राणे 

"एसटीच्या 40 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. पगार नाही आणि हे आता खाजगीकरण करतायेत. म्हणजे बेकार सगळी मराठी माणसं. मी बेस्टचा चेअरमन होतो, तेव्हा बेस्ट भरभराटीला होती. चांगली चालत होती. आता तीच बेस्ट विकायला काढली. मुख्यमंत्री सत्तेत आल्यापासून हे बंद ते बंद. आजारी असल्यामुळे जास्त बोलत नाही. राज्य कसं चालवावं याचा अभ्यास नाही. त्यावेळी माझ्या अगोदर गुंडांची दहशत होती. पाकिस्तान, दुबईमधून मुंबईवर हल्ले होत होते. अशा वेळी मी मुख्यमंत्री झालो. दहशतवाद निपटून काढला. एकूण 90 लोकांना वर पोहोचवलं. आहे का? तुमच्या मुख्यमंत्र्यांत दम", असं म्हणत नारायण राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget