एक्स्प्लोर

Baba Siddiqui Murder : बाबा सिद्धीकींची हत्या करून आरोपी शिवानंद कसा पळाला? गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्हीतून माग काढला!

बाबा सिद्धीकी यांची हत्या करून पळालेल्या आरोपी शिवानंदचं शेवटी पनवेलमध्ये दिसून आलं आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा आरोपी ज्या ज्या मार्गाने पळाला त्या त्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले आहेत.

Baba Siddiqui Murder : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (12 ऑक्टोबर ) रात्री मुंबईतील वांद्रे पूर्व भागात तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. निर्मल नगर येथील कोलगेट मैदानाजवळ बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली, त्यानंतर दोन आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून एकजण फरार झाला असून त्याचं नाव शिवानंद आहे. 

आरोपी शिवानंदचं शेवटचं लोकेशन सापडलं 

बाबा सिद्धीकी यांची हत्या करून पळालेल्या आरोपी शिवानंदचं शेवटी पनवेलमध्ये दिसून आलं आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा आरोपी ज्या ज्या मार्गाने पळाला त्या त्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले आहेत. आरोपीने वांद्रेहून रिक्षाने कुर्ला स्थानक गाठले, कुर्लाहून हार्बर ट्रेन पकडून आरोपी पनवेल स्थानकावर गेल्याचे तपासात समोर आलं आहे. सीसीटीव्हीचा माग काढत पोलिसांना तो शेवटी पनवेलमधील सीसीटिव्हीत आढळून आला आहे. पनवेलहून आरोपी एक्सप्रेसच्या मदतीने राज्याबाहेर गेल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपींच्या शोधासाठी उज्जेन (मध्यप्रदेश), हरियाणा, यूपी, दिल्ली या ठिकाणी गुन्हे शाखेची पथक गेली आहेत. 

लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली

दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळी झाडल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. बाबा सिद्दीकी हे सलमान खान, शाहरुख खान आणि संजय दत्तसह अनेक बॉलिवूड स्टार्सचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या पोस्टमध्ये सलमान खान आणि दाऊद गँगचाही उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

बाबा सिद्दीकींची गाडी बुलेटप्रूफ असतानाही काचेतून गोळी आत गेली

दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी 66 वर्षीय बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या ठिकाणाहून सहा रिकाम्या गोळ्या जप्त केल्या आहेत. त्यांच्या छातीत तीन गोळ्या लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बाबा सिद्दीकींची गाडी बुलेटप्रूफ असतानाही काचेतून गोळी आत गेली. हा गुन्हा करण्यासाठी ९.९ एमएम पिस्तुलचा वापर करण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील तिसऱ्या आरोपीची ओळख पटली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या आरोपीचे नाव शिवकुमार असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल. या नावाची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नसली तरी लवकरच नावाची पडताळणी केली जाईल.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : प्रकाशला पाडायचं! सुर्वेंच्या मागाठण्यात राज ठाकरेंचं झंझावाती भाषणSharad Pawar Speech: ते ठरविण्याचा अधिकार माझा, भर सभेत पवारांनी उमेदवाराला ठणकावून सांगितलंNitin Gadkari Zero Hour : शरद पवार रिंगमास्टर, मविआ सर्कस; नितीन गडकरींची स्फोटक मुलाखत ABP MAJHARaj Thackeray Full Dindoshi | 'बाण' ते 'खान' दिंडोशींच्या सभेत राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर कडाडले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Embed widget