एक्स्प्लोर

Holi 2023 : आला होळीचा सण लय भारी...राज्यभरात धुळवडीचा उत्साह

Holi 2023 : महाराष्ट्रासह देशभरात होळी आणि धुळवडीचा सण उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला. पोलिसांनीदेखील चोख बंदोबस्त ठेवला होता.

Holi 2023 Maharashtra :  राज्यासह देशभरात धुळवडीचा उत्साह (Holi Celebration) दिसून आला. अनेक ठिकाणी पांरपरीकपणे धुळवड साजरी करण्यात आली. तर, शहरी भागात रंगांची उधळण करत डीजेच्या तालावर आज रंगाचा सण साजरा करण्यात आला. एरवी, राजकीय शिमगा करणाऱ्या राजकीय मंडळींनीदेखील आज धुळवडीचा आनंद लुटला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राजकीय नेत्यांनीदेखील धुळवड साजरी केली. कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे निवासस्थानी धुळवड साजरी केली. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरक्षा बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनाही शुभेच्छा दिल्या. भाजप महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी सन अँड सन्स या जुहू चौपाटी परिसरात असणाऱ्या हॉटेलमध्ये धूळवड साजरी केली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.  

जालनामध्ये अनोखा प्रथा 

जालना येथे धुलीवंदनाच्या निमित्ताने  134 वर्षांची परंपरा असलेली 'हत्ती रिसाला' मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प्रतिकात्मक लोखंडी हत्तीची बैलगाडी मध्ये मिरवणूक काढली जाते. या हत्तीवर वंश परंपरेने एका व्यक्तीला राजा म्हणून बसवले जाते. हा राजा याच हत्तीवर बसून लोकांना रेवड्या वाटतो. दरम्यान ही मिरवणूक ज्या भागातून जाते त्या ठिकाणी रंग खेळणे बंद करण्यात येत.  गेल्या 134 वर्षांपासून हा संकेत पाळला जातो. निझाम राजवटीपासून ही प्रथा रूढ झाल्याचा इतिहास  सांगितला जातो. 

धुलीवंदनला जावयाची गाढवावरून जंगी मिरवणूक

बीडमध्ये जावयाला चक्क गाढवावर बसवून त्याची गावभर मिरवणूक काढली जाते. बीड जिल्ह्यातील विडा गावात ही परंपरा जपली जाते. विडा गावात 150 घरजावई कायमस्वरुपी वास्तव्यास आहेत. धुलीवंदनाच्या दोन दिवस अगोदर जावई शोधण्याची मोहीम गावकरी हाती घेतात. बरेच जावई गावकऱ्यांच्या सापळ्यातून निसटूनही जातात. कोणता जावई कुठे आहे याचा तपास करण्यासाठी गावात पथकही नेमले जातं.  यावर्षी 19 जणांच्या पथकाने जावयाचा शोध घेतला आणि केज तालुक्यातल्या जवळबन येथील अविनाश करपे यांना यावर्षी गाढवावर बसण्याचा मान मिळाला आहे. 

कोकणात शिमगोत्सव

कोकणात पांरपरिक पद्धतीने होळी-शिमगा उत्सव साजरा करण्यात आला. देवाच्या पालख्या नाचवण्यात आल्या. यामध्ये ग्रामस्थांनी सहभाग घेतला. देवाच्या पालखीत देवाचे मुखवटे असतात. फक्त पालखीच्या वेळी देवळातून हे मुखवटे बाहेर काढले जातात. पालखी घरोघरी जाते आणि त्याचे पूजन केले जाते. आगामी काही दिवस पारंपरिक पद्धतीने कोकणात शिमगा साजरा केला जातो. 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वरळीतल्या कोळीवाड्याला भेट दिली. कोळीवाड्यात पारंपरीक पद्धतीने होळी साजरी केली जाते. यावेळी कोळी बांधवामधील उत्साह पाहण्यासारखा असतो. आदित्य ठाकरेंनी स्थानिक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.  वरळी कोळीवाड्यात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. प्रत्येक चौकात होळी पेटवली जाते. यावेळी आदित्य यांनी पारंपरिक वाद्यावर ठेकाही धरला होता.  

मांसाहारावर ताव

धुळवडीनिमित्ताने मटण, कोंबडीवर अनेकांनी ताव मारला. मटण घेण्याबरोबरच फिश आणि चिकन घेण्यासाठी देखील नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. 

धुळवड खेळून रंग धुण्यासाठी गेलेल्या एकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू 

धुळवड खेळून रंग धुण्यासाठी गेलेल्या एकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. जयदीप पाटील अस मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. सात ते आठ जणांचा ग्रुप धुळवड खेळून झाल्यानंतर रंग धुण्यासाठी मावळ मधील वराळे गावामधील इंद्रायणी नदी परिसरात गेले होते. त्यावेळी मयत जयदीप आणि त्याचे काही मित्र रंग धुण्यासाठी पाण्यात उतरले असता नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने जयदीप पाटील यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. वराळेमधील डॉ डी.वाय. पाटील महाविद्यालयात हे सर्व विद्यार्थी शिक्षण घेत होते. तर मयत विद्यार्थी जयदीप पाटील हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील तारखेड गावातील रहिवासी आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रशांत कोरटकर धमकी प्रकरण : राज्य सरकारची बाजू ऐकून प्रकरणावर योग्य तो निर्णय द्या, हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला निर्देश
प्रशांत कोरटकर धमकी प्रकरण : राज्य सरकारची बाजू ऐकून प्रकरणावर योग्य तो निर्णय द्या, हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला निर्देश
Abu Azmi : औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्या अबू आझमींची छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त खास पोस्ट; म्हणाले...
औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्या अबू आझमींची छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त खास पोस्ट; म्हणाले...
KK Wagan Pakistan ambassador to Turkmenistan : पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय बेईज्जती सुरुच! अमेरिकेत पोहोचलेल्या राजदूतांना विमानतळावरूनच घरी पाठवलं
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय बेईज्जती सुरुच! अमेरिकेत पोहोचलेल्या राजदूतांना विमानतळावरूनच घरी पाठवलं
युझवेंद्र चहलसोबत दिसलेली आरजे माहवश नेमकी कोण आहे?
युझवेंद्र चहलसोबत दिसलेली आरजे माहवश नेमकी कोण आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार : भास्कर जाधवRavindra Dhangekar : वक्फ बोर्डाच्या जमीन खरेदीचं प्रकरण हे  माझ्याविरोधातलं षडयंत्र-धंगेकरContract Cleaner Mahapalika : 580 कंत्राटी सफाई कामगार मुंबई महापालिकेत कायम9 Sec Superfast News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा : 11 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रशांत कोरटकर धमकी प्रकरण : राज्य सरकारची बाजू ऐकून प्रकरणावर योग्य तो निर्णय द्या, हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला निर्देश
प्रशांत कोरटकर धमकी प्रकरण : राज्य सरकारची बाजू ऐकून प्रकरणावर योग्य तो निर्णय द्या, हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला निर्देश
Abu Azmi : औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्या अबू आझमींची छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त खास पोस्ट; म्हणाले...
औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्या अबू आझमींची छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त खास पोस्ट; म्हणाले...
KK Wagan Pakistan ambassador to Turkmenistan : पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय बेईज्जती सुरुच! अमेरिकेत पोहोचलेल्या राजदूतांना विमानतळावरूनच घरी पाठवलं
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय बेईज्जती सुरुच! अमेरिकेत पोहोचलेल्या राजदूतांना विमानतळावरूनच घरी पाठवलं
युझवेंद्र चहलसोबत दिसलेली आरजे माहवश नेमकी कोण आहे?
युझवेंद्र चहलसोबत दिसलेली आरजे माहवश नेमकी कोण आहे?
Sanjay Raut on Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर बायकोमुळे काँग्रेस सोडून शिंदे गटात का गेले? संजय राऊतांचा सनसनाटी दावा
रवींद्र धंगेकर बायकोमुळे काँग्रेस सोडून शिंदे गटात का गेले? संजय राऊतांचा सनसनाटी दावा
Satish Bhosale aka Khokya Bhai: सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, पोलिसांना शरण येण्यापूर्वी कायदेशीर फिल्डिंग, वकील म्हणाले...
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या वकिलांनी कायद्याचा कीस पाडला, बिनतोड युक्तिवाद, म्हणाले...
भाजप नेत्याच्या थेट पोटात विषारी इंजेक्शन टोचून निर्घृण हत्या; माजी मुख्यमंत्र्यांविरोधात लढवली होती निवडणूक, पत्नी तिसऱ्यांदा सरपंच
भाजप नेत्याच्या थेट पोटात विषारी इंजेक्शन टोचून निर्घृण हत्या; माजी मुख्यमंत्र्यांविरोधात लढवली होती निवडणूक, पत्नी तिसऱ्यांदा सरपंच
Champions Trophy टीम ऑफ टूर्नामेंट जाहीर, रोहित शर्माला स्थान नाही
Champions Trophy टीम ऑफ टूर्नामेंट जाहीर, रोहित शर्माला स्थान नाही
Embed widget