Congress MLA Meets CM: हायकमांडच्या रडारवर असलेले काँग्रेसचे 'ते' दोन आमदार रात्री गुपचूप एकनाथ शिंदेंना भेटले, बातमी बाहेर येताच म्हणाले...
Congress MLA Meets CM Eknath Shinde: विधानपरिषदेच्या निवडणूकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर या भेटीबाबत दोन्ही नेत्यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे.
Congress MLA Meets CM Eknath Shinde: गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात भूंकप होईल अनेक आमदार या-त्या पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू असतात. अशातच नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटींग झाल्याच्या चर्चा रंगल्या. या दरम्यान आज राज्यातील काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री (13 ऑगस्ट) या दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) आणि जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे काँग्रेसचे हे दोन आमदार पक्षाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. विधानपरिषदेच्या निवडणूकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) आणि जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर या भेटीबाबत दोन्ही नेत्यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे.
एबीपी माझाशी बोलताना काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) आणि जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी भेटीचं कारण सांगितलं आहे. तर पक्षप्रवेशाच्या बातम्याचे त्यांनी खंडन केले आहे.
जितेश अंतापूरकर यांची प्रतिक्रिया
काल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माझ्या मतदारसंघात 2023 साली अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. त्यांची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी आणि शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन पिकासाठी एकरी ५ हजार रूपये शासकीय मदत ई-पीक पाहाणी केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार असं जाहीर केलं होतं. त्यासंदर्भात शेतकरी नाराज आहेत. कारण ई-पीक पाहाणी केलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहाणी झाली नाही त्यांच्यामध्ये मदत मिळत नसल्याने नाराजी आहे. ५ हजार रूपये मदत देखील तुटपुंजी आहे, ती वाढवून मिळावी आणि लवकरात लवकर मिळावी यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असं जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी म्हटलं आहे.
तर मी ई-पिक पाहणी अहवाला संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आमच्याकडे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मला मुख्यमंत्री यांनी वेळ दिली होती. त्यामुळे मी भेट घेतली. राजकीय चर्चा केली नाही, अशी माहिती जितेश अंतापुरकर (Jitesh Antapurkar) यांनी दिली.
हिरामण खोसकर काय म्हणाले?
निधी मिळण्यासाठी मी त्यांना भेटलो. बाकी काही छोटी कामं आणि मतदारसंघातील कामांसाठी मी त्यांची भेट घेतली आहे. मी काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेससोबतच राहणार आहे. मला उमेदवारी मिळणार आहे. मी निधीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असं हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी 'एबीपी माझा'सोबत बोलताना सांगितलं. काँग्रेस नेते मलाच तिकीट देणार आहे. मला लोकांनी निवडून दिलेले आहे. त्यांची काम करणं माझं कर्तव्य आहे. मतदारसंघातील ५ कोटी रुपयांची काम मंजूर झाले आहे. पुन्हा मुख्यमंत्री यांच्याकडे मला जायचं आहे. आता मी अजित पवार यांच्याकडे जाणार आहे. माझ्या मतदारसंघातील कामासाठी मी भेटलो असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
संबधित बातम्या - मोठी बातमी: काँग्रेसचे दोन आमदार शिंदे गटात जाणार?, हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट