Hindenburg Research: लवकरच येणार हिंडनबर्गचा नवा रिपोर्ट, नेमका काय करणार धमाका? सर्वांनाच उत्सुकता
Hindenburg Research: हिंडनबर्गचा नवा रिपोर्ट येणार आहे. हा नवा रिपोर्ट आता कोणता धमाका करणार? याची उत्सुकता सर्वांना आहे.
Hindenburg Research: हिंडनबर्ग रिसर्चचा (Hindenburg Research on Adani Group) अहवाल समोर आल्यानंतर भारतातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दणका बसला. त्यानंतर हिंडेनबर्ग रिसर्च चर्चेत आले. आता लवकरच हिंडनबर्गचा नवा रिपोर्ट येणार आहे. हा नवा रिपोर्ट आता कोणता धमाका करणार? याची उत्सुकता सर्वांना आहे.
New report soon—another big one.
— Hindenburg Research (@HindenburgRes) March 22, 2023
हिंडनबर्ग रिसर्चने ट्विट करत ही माहिती दिली आहे. या रिपोर्टमध्ये नवे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. हिंडनबर्ग रिसर्चने 24 जानेवारीला अदानी समूहाविषयी एक अहवाल प्रसिद्ध केला होत. या अहवालात अदानी समूहातील कंपन्यांच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच स्टॉक फेरफार आणि अकाउंटिंग फसवणुकीचा हवाला देत अदानी ग्रुपवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अदानी समूहाच्या बाँड आणि शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती.अहवालानंतर अदानींची संपत्ती 15 अदानी यांच्या मोठ्या संपत्तीत घट झाली असून सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतून त्यांना टॉप-10 मधील स्थान गमवावे लागले होते. गौतम अदानी समूहाविषयी केलेल्या खुलाशानंतर आता हिंडनबर्ग रिसर्चने नवा खुलासा करण्याची माहिती दिली आहे. लवकरच नवा रिपोर्ट येणार असून यात नवे मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.
नवे मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता
गौतम अदानी समूहाविषयी केलेल्या खुलाशानंतर आता हिंडनबर्ग रिसर्चने नवा खुलासा करण्याची माहिती दिली आहे. लवकरच नवा रिपोर्ट येणार असून यात नवे मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत बॅंकांसंदर्भात हा रिसर्च असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या ट्विटनंतर सर्वांचे लक्ष आता हिंडनबर्गच्या नव्या रिपोर्टकडे आहे.
हिंडनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाकडून समिती गठित
अदानी-हिंडनबर्ग प्रकरणाच्या (Adani Hinderburg Case) चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) समिती गठित करण्यात आली आहे. सहा जणांची समिती सुप्रीम कोर्टाकडून स्थापन करण्यात आली आहे. शेअर बाजारातील घसरणीचे कारण आणि गुंतवणुकदारांचे नुकसान याची चौकशी ही समिती करणार आहे. या समितीने दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
किती कंपन्यां हिंडनबर्गला लक्ष्य केल्या आहेत?
हिंडेनबर्गने 2017 पासून किमान 16 कंपन्यांमध्ये संभाव्य गैरकृत्यांचा भांडाफोड केला आहे. ट्विटर डीलवरूनही हिंडेनबर्ग रिसर्चने भाष्य केले होते.
हिंडेनबर्ग संस्थापक कोण आहेत?
नॅथन अँडरसन हिंडनबर्ग रिसर्च संस्थापक आहेत. अँडरसन यांनी कनेक्टिकट विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय व्यवसायात पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी डेटा कंपनी फॅक्टसेट रिसर्च सिस्टम्स इंक येथे वित्त क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली, जिथे त्यांनी गुंतवणूक व्यवस्थापन कंपन्यांमध्ये काम केले.