एक्स्प्लोर

पॉर्नोग्राफी प्रकरणी गेहनाला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, गेहनाचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला

अश्लील चित्रपटात अभिनय केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या गेहना वाशिष्टनं पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक होऊ नये, म्हणून गेहनाने अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायासयात अर्ज दाखल केला होता.

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात गेहना वसिष्ठचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आपला निकाल राखून ठेवला असून निकाल मंगळवारी जाहीर केला. दरम्यान मुंबई पोलिसांनी गेहनाविरोधात आयपीसी कलम 370(मानवी तस्करी) लवण्याची मागणी करत सत्र न्यायालयात अर्ज सादर केला आहे.

अश्लील चित्रपटात अभिनय केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या गेहना वाशिष्टनं पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक होऊ नये, म्हणून गेहनाने अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायासयात अर्ज दाखल केला होता. तो फेटाळ्यात आल्यानंतर तिनं हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. या याचिका याचिकेवर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. गेहनाची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडे आवश्यक ती सर्व माहिती आहे. याआधी तिला अटकही करण्यात आली होती. ज्यात चार महिन्यांहून अधिकाकाळ ती कारागृहात होती. ती तुरुंगात असतानाच तिच्याविरोधात दुसरी एफआयआर नोंदविण्यात आली आणि सुटल्यानंतर तिसरी एफआयआर नोंदविण्यात आली.

तिसऱ्या एफआयआरमध्ये पोलिसांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले असून आरोपींनी पीडितांना चुंबन आणि लैंगिक दृश्ये करण्यास भाग पाडलं. तसेच  वेबसीरिजची दृश्य एक खोलीत काही लोकांच्या उपस्थितीत चित्रीत करण्यात आली. तक्रारदार महिलेनं त्या चित्रपटाचे प्रमोशनही केलं होतं. त्यामुळे इथे पोलिसांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून आम्ही मोठ्या लोकांची नावं जाहीर करू मग ते आम्हाला जामीन मिळू देतील. तसेच चौथी एफआयआर दाखल करून पुन्हा अटकही होऊ शकते असा आरोप गेहनाच्यावतीनं करण्यात आला. गेहनाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बॅंक खात्यांची माहितीही पोलिसांकडे असल्याचं कोर्टात सांगतिलं गेलं होतं. 

त्यावर दुसरी एफआयआर दाखल झाल्यांनतर तुम्ही याचिकाकर्ते ताब्यात असताना त्यांच्या सहभागाबाबत चौकशी का केली नाही?, तसेच त्या ओटीटीच्या मालकाला अद्याप का शोधू शकला नाहीत? फेब्रुवारी 2021 मध्ये तुम्ही कोणती माहिती गोळा केली?, आता कोणती नवी माहिती मिळविण्यासाठी तुम्ही याचिकाकर्त्यांची कोठडी मागत आहात?, त्याची माहिती न्यायालयात सादर करा असे प्रश्न उपस्थित करत ही सारी माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. तसेच जर कथित घटना फेब्रुवारीमध्ये घडली तर ती मार्चमध्ये चित्रिकरणासाठी कशी जाऊ शकते?, तसेच एका महिन्याच्या आत एखादी व्यक्ती अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये वारंवार कशी गुंतू शकते? असे सवालही न्यायालयाने उपस्थित केले होते. मात्र सरकारी पक्षानं याप्रकरणी समोर आलेल्या नव्या पुराव्यांनुसारच गेहनाविरोधात तिसरा गुन्हा दाखल केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. तसेच साक्षीदारांमध्ये पीडीतांचाही सामावेश असून त्यांनी गेहना वसिष्ठविरोधात थेट आरोप केल्याची माहिती सरकारी वकिलांनी हायकोर्टापुढे मांडली होती. ज्याची दखल घेत हायकोर्टानं गेहनाला कोणताही दिलासा देण्यास नकार देत तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : राहुड घाटात टँकर उलटल्याने गॅस गळती, एकाचा मृत्यू, गळती रोखण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
राहुड घाटात टँकर उलटल्याने गॅस गळती, एकाचा मृत्यू, गळती रोखण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
Pune Crime Ayush Komkar: डोळ्यात पाणी; हातात पोरानं पाठवलेलं कार्ड, मृतदेह पाहताच फोडला हंबरडा, गणेश कोमकर तगड्या बंदोबस्तात लेकाच्या अंत्यविधीला
डोळ्यात पाणी; हातात पोरानं पाठवलेलं कार्ड, मृतदेह पाहताच फोडला हंबरडा, गणेश कोमकर तगड्या बंदोबस्तात लेकाच्या अंत्यविधीला
Sanjay Raut on Krupal Tumane : संजय राऊतांवर नाराज असल्याने ठाकरेंचे आमदार शिंदे गटात जाणार, शिवसेना नेत्याच्या दाव्यावर खुद्द राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
संजय राऊतांवर नाराज असल्याने ठाकरेंचे आमदार शिंदे गटात जाणार, शिवसेना नेत्याच्या दाव्यावर खुद्द राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Pune Crime news Ayush Komkar: पुण्यातील आयुष कोमकर हत्याप्रकरणात मोठी अपडेट, बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक, पळण्यापूर्वीच मुसक्या आवळल्या
पुण्यातील आयुष कोमकर हत्याप्रकरणात मोठी अपडेट, बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक, पळण्यापूर्वीच मुसक्या आवळल्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : राहुड घाटात टँकर उलटल्याने गॅस गळती, एकाचा मृत्यू, गळती रोखण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
राहुड घाटात टँकर उलटल्याने गॅस गळती, एकाचा मृत्यू, गळती रोखण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
Pune Crime Ayush Komkar: डोळ्यात पाणी; हातात पोरानं पाठवलेलं कार्ड, मृतदेह पाहताच फोडला हंबरडा, गणेश कोमकर तगड्या बंदोबस्तात लेकाच्या अंत्यविधीला
डोळ्यात पाणी; हातात पोरानं पाठवलेलं कार्ड, मृतदेह पाहताच फोडला हंबरडा, गणेश कोमकर तगड्या बंदोबस्तात लेकाच्या अंत्यविधीला
Sanjay Raut on Krupal Tumane : संजय राऊतांवर नाराज असल्याने ठाकरेंचे आमदार शिंदे गटात जाणार, शिवसेना नेत्याच्या दाव्यावर खुद्द राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
संजय राऊतांवर नाराज असल्याने ठाकरेंचे आमदार शिंदे गटात जाणार, शिवसेना नेत्याच्या दाव्यावर खुद्द राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Pune Crime news Ayush Komkar: पुण्यातील आयुष कोमकर हत्याप्रकरणात मोठी अपडेट, बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक, पळण्यापूर्वीच मुसक्या आवळल्या
पुण्यातील आयुष कोमकर हत्याप्रकरणात मोठी अपडेट, बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक, पळण्यापूर्वीच मुसक्या आवळल्या
Shiv Sena Crisis : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरेंचे दोन आमदार सोडले तर सर्वच आमदार शिवसेनेच्या संपर्कात, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरेंचे दोन आमदार सोडले तर सर्वच आमदार शिवसेनेच्या संपर्कात, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा
फ्रान्सचे पंतप्रधान फ्रांस्वा बायरु यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव नामंजूर, सरकार पडलं, मोठी नामुष्की
फ्रान्सचे पंतप्रधान फ्रांस्वा बायरु यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव नामंजूर, सरकार पडलं, मोठी नामुष्की
Devendra Fadnavis: अनेकांना वाटलं माझी राख होईल पण प्रत्येकवेळी मी भरारी घेतलेय: देवेंद्र फडणवीस
अनेकांना वाटलं माझी राख होईल पण प्रत्येकवेळी मी भरारी घेतलेय: देवेंद्र फडणवीस
Maharashtra LIVE: छगन भुजबळ मंत्रिमंडळाच्या बैठकीला आजही गैहजर राहण्याची शक्यता; सरकारला कोर्टात खेचण्याच्या तयारीत
Maharashtra LIVE: छगन भुजबळ मंत्रिमंडळाच्या बैठकीला आजही गैहजर राहण्याची शक्यता; सरकारला कोर्टात खेचण्याच्या तयारीत
Embed widget