एक्स्प्लोर

मॅनहोलमध्ये सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास नुकसानभरपाईचं काय? हायकोर्टाचा सरकारला सवाल

सफाई कामगारांना नेहमीच त्यांना मिळणाऱ्या सवलतींपासून वंचित ठेवले जाते, असा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. उच्च न्यायालयाने याप्रकरणी राज्य सरकारला खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : मुंबईसह राज्यभरात नाल्यांची, गटारांची, मॅनहोल्सची सफाई करणाऱ्या कामगारांना तसेच इतर सफाई कामगारांना कायद्यानुसार आवश्‍यक असलेल्या सवलतींपासून वंचित ठेवले जाते, असा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर खुलासा करण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंग यांनी अॅड. इशा सिंह यांच्यामार्फत यासंदर्भांत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मुंबईसह राज्यभरात कचरा उचलण्याचे काम करणारे तसेच मॅनहोलमध्ये जाऊन सफाई करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेबाबत कायद्यानुसार मार्गदर्शक तत्वे निश्‍चित करण्यात आलेली आहेत. मात्र या तत्वांचे पालन पालिका प्रशासन आणि राज्य सरकारकडून केले जात नाही, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. सर्वोच्च न्यायलयाने साल 2014 मध्ये दिलेल्या निकालानुसार जर सफाई कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश आहेत. मात्र चालू वर्षात मुंबई, पनवेलसह अन्य ठिकाणी मिळून राज्यात बारा सफाई कामगारांचा सेवा बजावत असताना मृत्यू झाला आहे. मात्र त्यांच्या वारशांना अशाप्रकारचे आर्थिक सहाय्य करण्यात आलेले नाही, असेही याचिकेत निदर्शनास आणण्यात आले आहे. बऱ्याचदा या प्रकरणाच्या चौकशीत अशाप्रकारचे मृत्यु हे अपघाती मृत्यू ठरवले जातात आणि त्यासाठी कोणालाही जबाबदार ठरवले जात नाही. असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. हायकोर्टाने या याचिकेची दखल घेत याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत खुलासा करण्याचे निर्देश देत सुनावणी 29 जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget