एक्स्प्लोर

मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ, येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडले, सीमेवरील गावांना पाण्याचा विळखा, कुठे काय परिस्थिती?

Weather Update: परभणीतील येलदरी प्रकल्पा बरोबरच सेलूच्या लोअर दुधना धरणातून ही पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.लोअर दुधना 70% भरले असुन सध्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे

Marathwada Weather Update: मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातलाय. अनेक धरणे फुल्ल झाली आहेत.  लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिवसह बहुतांश ठिकाणी धरणक्षेत्रात पडलॆल्या पावसाने पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण असलेले येलदरी हे पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण परिसरात सुरू असलेला पाऊस तसेच खडकपूर्णा प्रकल्पातून वाढलेली पाण्याची आवक यामुळे धरणाचे सर्व 10 दरवाजे उघडण्यात आले. दरवाज्यांमधून व जलविद्युत केंद्राच्या टर्बाइनमधून मिळून एकूण 23,800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण भरल्याने परभणी, हिंगोली, नांदेड, वसमत, पूर्णा ही 5 प्रमुख शहरे तसेच 200 खेड्यांचा पाणी प्रश्न मिटला असून जवळपास 70,000 हेक्टरवरील शेतीला याचा लाभ होणार आहे.

उदगीर तालुक्यात पुराचा तडाखा – कार वाहून गेली, शोधकार्य सुरू

उदगीर तालुक्यात रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री 9 वाजता सुरू झालेला पाऊस अद्याप सुरूच असून लेंडी नदीला पूर आल्याने धडकनाळ व बोरगाव या गावांमध्ये पाणी शिरले.

बोरगावाने अक्षरशः तळ्याचे रूप धारण केले असून गाव चारही बाजूंनी पाण्याने वेढले गेले आहे.रात्री 2 वाजल्यापासून गावकरी जागेच राहून रात्र काढली.उदगीर–मुक्रमाबाद–देगलूर रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. धडकनाळ येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.याच भागात एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती असून प्रशासन हरवलेल्या लोकांचा शोध घेत आहे.गावात पाणी शिरल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पिके आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले असून हजारो एकर जमीन खरवडून गेली आहे.

धडकनाळचे धडकी भरवणारे दृश्य

लातूर–नांदेड–कर्नाटक सीमारेषेवरील धडकनाळ गाव सध्या प्रचंड पाण्याच्या विळख्यात आले आहे.

  • 1 किलोमीटरहून अधिक रस्ता पूर्णपणे पाण्याखाली.
  • उदगीर–मुक्रमाबाद–देगलूर मुख्य रस्ता धडकनाळजवळ ठप्प.
  • लेंडी नदीला आलेल्या तुफान पुरामुळे गावांमध्ये पाणीच पाणी.
  • शेतशिवारावरून गेलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे जमीन खरडून गेली आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

हे दृश्य अक्षरशः धडकी भरवणारे असून पाण्याचा जोर एवढा प्रचंड आहे की कुणालाही त्यात अडकण्याचा धोका मोठा आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पावसाचा मोठा परिणाम, वाहतूक ठप्प

लातूर जिल्ह्यातील उदगीर व अहमदपूर तालुक्यातील वाहतुकीवर पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. पुलावरून पाणी गेल्याने 5 ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

  1. उदगीर–देगलूर मार्गावरील करजखेल पुलावरून पाणी जात असल्याने मार्ग बंद.

  2. उदगीर–हानेगाव मार्गे हंगरगा, गळसुबाई तांडा येथील पूल पाण्याखाली.

  3. उदगीर–होकर्णा मार्गावरील भवानी दापका पूल पाण्याखाली.

  4. माणकेश्वर–उदगीर मार्गावरील इंद्रराळ पूल पाण्याखाली.

  5. अहमदपूर–अंधोरी मार्ग पावसामुळे बंद.

येलदरी पाठोपाठ परभणीच्या लोअर दुधना धरणातून सोडले पाणी

परभणीतील येलदरी प्रकल्पा बरोबरच सेलूच्या लोअर दुधना धरणातून ही पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.लोअर दुधना 70% भरले असुन सध्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहे ज्यातुन 2639 क्युसेक्स वेगाने पाणी दुधना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.हा विसर्ग अजून वाढण्याची शक्यता असल्याने दुधना नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Police On Pranit More Controversy: प्रणित मोरेच्या '370 बिर्याणी' वादात मुंबई पोलिसांची मार्मिक पोस्ट चर्चेत; म्हणाले 'आमच्या लॉकअपमध्ये ... '
प्रणित मोरेच्या '370 बिर्याणी' वादात मुंबई पोलिसांची मार्मिक पोस्ट चर्चेत; म्हणाले 'आमच्या लॉकअपमध्ये ... '
Sunetra Pawar VIDEO : आतापर्यंत सगळं समजून घेतलं, यापुढे कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर विचार केला जाईल; सुनेत्रा पवारांचा नेत्यांना इशारा
आतापर्यंत सगळं समजून घेतलं, यापुढे कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर विचार केला जाईल; सुनेत्रा पवारांचा नेत्यांना इशारा
पक्षाच्या हिताला प्राधान्य देऊन कार्यकर्त्यांना संधी देणार, अजितदादांप्रमाणे कडक निर्णय घेणार : सुनेत्रा पवार
पक्षाच्या हिताला प्राधान्य देऊन कार्यकर्त्यांना संधी देणार, अजितदादांप्रमाणे कडक निर्णय घेणार : सुनेत्रा पवार
Chhagan Bhujbal : राजकारणाचा खेळ करू नका, भुजबळांचा तटकरेंना टोला; संपूर्ण भाषणात शरद पवारांचे दाखले, आता निष्ठा सुनेत्रा पवारांच्या चरणी
राजकारणाचा खेळ करू नका, भुजबळांचा तटकरेंना टोला; संपूर्ण भाषणात शरद पवारांचे दाखले, आता निष्ठा सुनेत्रा पवारांच्या चरणी

व्हिडीओ

Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
Abhijeet Dipke PC :कुठे कुठे आंदोलन करणार? टार्गेटकाय? अभिजीत दिपकेंची पत्रकार परिषद
Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TMC Crisis: चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
Nikhil Chaudhary: भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
India A vs Afghanistan A: कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
Cockroach Janta Party : पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
Prasad Vedpathak: सार्वजनिक ठिकाणच्या जैनांच्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात गांधीगिरी करणाऱ्या प्रसाद वेदपाठकचं इन्स्टा अकाउंट सस्पेन्ड!
सार्वजनिक ठिकाणच्या जैनांच्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात गांधीगिरी करणाऱ्या प्रसाद वेदपाठकचं इन्स्टा अकाउंट सस्पेन्ड!
Embed widget