एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरु आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरु आहे. लालबाग, परळ, वरळीसह मुलुंड, अंधेरी, घाटकोपर आणि पवई परिसरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाला.
पावसाने सुपर कमबॅक करत जोरदार वाऱ्यासह तुफान बरसायला सुरुवात केली. मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, घाटकोपर, पवई तर अंधेरी, मालाड, मीरा रोड, वांद्रे भागात दमदार पाऊस झाला. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना हवेतला गारवा आणि वातावरणातला बदल अनुभवायला मिळत आहे.
मुंबईतील 24 तासांतील पावसाची आकडेवारी
गिरगाव - 50 मिमी
अंधेरी - 55 मिमी
बीकेसी - 38 मिमी
बोरीवली - 40 मिमी
भांडूप - 68 मिमी
लालबाग - 39 मिमी
चेंबूर - 50 मिमी
कुलाबा - 45 मिमी
दादर - 40 मिमी
दहिसर - 41 मिमी
घाटकोपर - 55 मिमी
जुहू - 40 मिमी
सायन - 45 मिमी
मालाड - 35 मिमी
मुलुंड - 70 मिमी
परेल - 59 मिमी
विलेपार्ले - 45 मिमी
वरळी - 38 मिमी
विक्रोळी - 54 मिमी
दरम्यान, राज्यभरात येत्या काही तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शिवाय मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीत पावसाचा जोर कायम असल्याने वातावरणात चांगलाच गारवा आला आहे.
तर तिकडे विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत. परंतु नागपूर जिल्ह्यात अद्यापही पावसाने हवा तसा जोर दिसत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement