एक्स्प्लोर

विदर्भात मुसळधार पाऊस, 24 तासात सिरोंचा भागात 183 मिमी पावसाची नोंद, आजही मुसळधार पावसाचा इशारा

विदर्भात सध्या मुसळधार पाऊस (Vidarbha Heavy Rain) सुरु आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यामुळं वाहतुकीवर देखील परिणाम होत आहे.

Vidarbha Rain : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात सध्या मुसळधार पाऊस (Vidarbha Heavy Rain) सुरु आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यामुळं वाहतुकीवर देखील परिणाम होत आहे. गेल्या 24 तासात गडचिरोलीच्या (Gadchiroli) सिरोंचा भागात तब्बल 183 मिमी पावसाची नोंद झालीय. सिरोंचात ढगफुटी पाऊस झाल्यानं नदी नाल्याला पूर आला होता. यानंतर एका शाळेत अडकलेल्या 75 विद्यार्थ्यांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. 

गडचिरोली, भंडारा व नागपूर जिल्याच्या काही भागात पूर परिस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल व नदीकाठावरच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, नागपूरच्या वाडी, हिंगणा, डवलामेटी, सुराबर्डी भागात गेले दोन तास दमदार पाऊस होत आहे. विजांच्या कडकडाटासह पहाटेपासून पाऊस सुरू असून दृश्यमानता ही कमी झाली आहे.

राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागानं आज राज्यातील दोन जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी आणि  विदर्भातील गडचिरोली या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. या दोन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळं या दोन जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील नऊ जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मुंबईसह पालघर उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा यलो अल्ट जारी करण्यात आला आहे.

रायगडसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पाऊस

सध्या रायगडसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. रोहा येथील कुंडलिका नदी ही काल झालेल्या पावसामुळं दुथडी भरुन वाहताना दिसत आहे. त्यामुळं रोहा शहरातील नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षीत स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना रोहा नगरपरिषदेने केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

आज महाराष्ट्रात पडणार मुसळधार पाऊस, 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला; चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला; चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
Ghulam Mohammad Mir BJP: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर; 'या' मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्याने भूवया उंचावल्या!
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर; 'या' मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्याने भूवया उंचावल्या!
Auto Rickshaw Accident video: सर्वांची फिल्डिंग सेट झाली! एकाच वेळी तीन रिक्षांची टक्कर, बाजूचा दुचाकीवाला विचारतो,
Video: सर्वांची फिल्डिंग सेट झाली! एकाच वेळी तीन रिक्षांची टक्कर, बाजूचा दुचाकीवाला विचारतो, "पण मी काय केलं, माझा काय दोष?"
'संभाजीनगरचे 'शशी थरूर' म्हणून ओळखले जाणाऱ्या खासदार साहेबांनी..', संदीपान भुमरेंना संसदरत्न पुरस्कारावरून अंबादास दानवेंच्या पोस्टची भलतीच चर्चा!
'संभाजीनगरचे 'शशी थरूर' म्हणून ओळखले जाणाऱ्या खासदार साहेबांनी..', संदीपान भुमरेंना संसदरत्न पुरस्कारावरून अंबादास दानवेंच्या पोस्टची भलतीच चर्चा!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pawar Politics: काका-पुतणे पुन्हा एकत्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा
Thackeray Reunion : 'राजकारण विसरून मनोमिलन', 3 महिन्यांत सहावी भेट
Thackeray Reunion: मातोश्रीवर ठाकरे कुटुंबाचे स्नेहभोजन, राजकीय वर्तुळात चर्चा
Maha Politics: 'राजकीय चष्म्यातून बघू नका', Thackeray बंधूंच्या मनोमिलनावर राजकीय वर्तुळातून सावध प्रतिक्रिया
Thackeray Talks: 'मनं जुळली तर एकत्र घडी येऊ शकते', MNS नेते बाळा नांदगावकरांचं युतीवर मोठं विधान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला; चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला; चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
Ghulam Mohammad Mir BJP: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर; 'या' मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्याने भूवया उंचावल्या!
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर; 'या' मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्याने भूवया उंचावल्या!
Auto Rickshaw Accident video: सर्वांची फिल्डिंग सेट झाली! एकाच वेळी तीन रिक्षांची टक्कर, बाजूचा दुचाकीवाला विचारतो,
Video: सर्वांची फिल्डिंग सेट झाली! एकाच वेळी तीन रिक्षांची टक्कर, बाजूचा दुचाकीवाला विचारतो, "पण मी काय केलं, माझा काय दोष?"
'संभाजीनगरचे 'शशी थरूर' म्हणून ओळखले जाणाऱ्या खासदार साहेबांनी..', संदीपान भुमरेंना संसदरत्न पुरस्कारावरून अंबादास दानवेंच्या पोस्टची भलतीच चर्चा!
'संभाजीनगरचे 'शशी थरूर' म्हणून ओळखले जाणाऱ्या खासदार साहेबांनी..', संदीपान भुमरेंना संसदरत्न पुरस्कारावरून अंबादास दानवेंच्या पोस्टची भलतीच चर्चा!
Nora Fatehi Video: नोरा फतेहीचा एकवेळ डान्स परवडला, पण डोक्यात मुंग्या येणारं ते इंग्रजी तेवढं नको! त्या व्हायरल व्हिडिओची चर्चा
Video: नोरा फतेहीचा एकवेळ डान्स परवडला, पण डोक्यात मुंग्या येणारं ते इंग्रजी तेवढं नको! त्या व्हायरल व्हिडिओची चर्चा
दोन वर्षांपूर्वी लग्न, किरकोळ कारणातून वाद, नवऱ्यानं रेल्वेखाली उडी घेतली, बायकोला समजातच गळ्याला दोरी लावली; फक्त तासाभरात निशा-प्रमोदच्या संसाराची राखरांगोळी
दोन वर्षांपूर्वी लग्न, किरकोळ कारणातून वाद, नवऱ्यानं रेल्वेखाली उडी घेतली, बायकोला समजातच गळ्याला दोरी लावली; फक्त तासाभरात निशा-प्रमोदच्या संसाराची राखरांगोळी
World Cup Points Table : इंग्लंडची विजयाची हॅट्रिक! थेट पहिल्या स्थानावरील संघाला धक्का, टीम इंडियाचं भविष्य अंधारात, Points Table मध्ये मोठी उलथापालथ
इंग्लंडची विजयाची हॅट्रिक! थेट पहिल्या स्थानावरील संघाला धक्का, टीम इंडियाचं भविष्य अंधारात, Points Table मध्ये मोठी उलथापालथ
Zubeen Garg Death: भावापासून मॅनेजरपर्यंत 22 दिवसात 7 जणांना बेड्या, 11 जणांना समन्स तरीही पोलिसांना झुबीन गर्ग यांच्या मृत्यूच्या कारणांचा थांगपत्ता लागेना
भावापासून मॅनेजरपर्यंत 22 दिवसात 7 जणांना बेड्या, 11 जणांना समन्स तरीही पोलिसांना झुबीन गर्ग यांच्या मृत्यूच्या कारणांचा थांगपत्ता लागेना
Embed widget