एक्स्प्लोर

सलग दुसऱ्या दिवशी मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, येत्या 24 तासात महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोरदार पावसाचा इशारा

दरम्यान, येत्या 24 तासात मुंबईसह कोकणासह महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरु आहे.

मुंबई : काल सकाळपासून मुंबईत बरसत असलेला पाऊस अजूनही सुरुच आहे. जोरदार पावसामुळं मुंबईतल्या हिंदमाता, दादर, सायनच्या सखल भागात काही काळ पाणी साचलं होतं. त्यामुळं वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान, येत्या 24 तासात मुंबईसह कोकणासह महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरु आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या सुरळीतपणे आहे.  अद्याप या पावसाचा लोकल वाहतुकीला फटका बसला नाही. नवी मुंबई, पनवेल भागात मुसळधार पाऊस नवी मुंबई , पनवेल भागात रात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. शहरातील ऐरोली, कोपरखैरणे , वाशी, पनवेल भागात पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागला आहे. मुसळधार पावसामुळे कोपरखैरणे, नेरूळ, कळंबोली येथील हायवेला असणाऱ्या सबवेमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना त्यातून वाट काढत जावी लागत आहे. भिवंडीत 2 दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कामवारी नदीची पाणी पातळी वाढली आहे. शहरातल्या अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. भिवंडी-वाडा राज्य मार्गावरच्या शेलार गावातही 2 ते 3 फुटापर्यंत पाणी साचलं होतं. अनेक घरांत आणि दुकानात पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, कामवारी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे साताऱ्यात कोयणा, महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढलीय. त्यामुळे धरणाचे दरवाजे 2 फुटांवरुन 3 फुटांवर उचलण्यात आलेत. सध्या धरणातून 30 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कोयनेत सध्या 104. 5 टीएमसी पाणीसाठा आहे. पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.  पालघर बोईसर रोडवर सरावली येथे पाणी भरले आहे. तर वाणगाव भागातही रस्त्यावर पाणी आलं असून काही ठिकाणी सकल भागात पाणी साचले आहे. नदी नाल्यांनाही पूर यायला सुरुवात झाली आहे.  वाणगाव डहाणू रोडवर पाणी आल्याने वाहतूक बंद झाला आहे तर बोईसर चिल्हार रोडवर बेटेगाव येथे पाणी आल्याने रस्ता बंद आहे. गणेश मंडळांना पावसाच्या वेळी वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीकडून गणपती मंडळांना सूचना देण्यात आल्या आहेत.   मनुष्यहानी टाळण्यासाठी या सूचना केल्या असल्याची माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती अध्यक्ष अॅड.नरेश दहिबावकर यांनी दिली आहे. मंडपात पाणी शिरल्यास महापालिका कर्मचाऱ्यांना संपर्क करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget