एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुढचे पाच दिवस कोकणवगळता संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा
हवामान खात्याकडून कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी चार-पाच दिवसांमध्ये गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
मुंबई : हवामान खात्याकडून कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यासाठी आजचा दिवस (सोमवार, 1 एप्रिल) सोडून पुढच्या चार दिवसात, मध्य महाराष्ट्रासाठी पुढच्या तीन दिवसात, तर विदर्भासाठी पुढच्या पाच दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. तर काही ठिकाणी 38-39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे उष्माघाताच्या त्रासापासून वाचण्यासाठी गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
महाराष्ट्रात चंद्रपूरमध्ये 41 अंश, नागपूरमध्ये 40 अंश, औरंगाबाद 39 अंश, सोलापुरात 39 अंश, अक्कलकोट 38 अंश, बार्शी 38 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
करमणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement