एक्स्प्लोर

ह्रदयद्रावक... पहिल्याच दिवशीची शाळा सुटल्यानंतर फिरायला गेलेल्या 3 मुलींचा बुडून मृत्यू; गावावर शोककळा

मेंढवण गावातील सोमनाथ बढे यांच्या खासगी शेततळ्याचं काम सुरू होतं. मात्र, काही कारणास्तव हे काम सध्या बंद असल्याने शेततळं अर्धवटच बांधण्यात आलं होतं.

अहमदनगर : पावसाळा सुरू झाल्यामुळे पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची किंवा वीज पडून दुर्घटना झाल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावातील तीन मुलींचा पाण्यात बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. गावातील सोमनाथ बढे यांच्या शेतातील अर्धवट काम झालेल्या शेततळ्यात पडून तीन मुलींचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी व गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मुलींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आजपासून राज्यभरातील शाळा सुरू झाल्या असून शाळेच्या पहिल्याच दिवशी अशी दुर्घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

मेंढवण गावातील सोमनाथ बढे यांच्या खासगी शेततळ्याचं काम सुरू होतं. मात्र, काही कारणास्तव हे काम सध्या बंद असल्याने शेततळं अर्धवटच बांधण्यात आलं होतं. आज शाळेचा पहिलाच दिवस असल्याने शाळा सुटल्यानंतर फिरत फिरत तीन मुली शेततळ्याकडे गेल्या. या शेततळ्यात पावसाचं पाणी साचलं होतं. दुर्दैवाने खेळत असताना पाण्यात बुडून तिन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अनुष्का बडे (11 वर्ष), सृष्टी ठापसे (13 वर्षे) आणि वैष्णवी जाधव (12 वर्ष) अशी तिन्ही मुलींची नावे आहेत. या तिन्ही मुली मैत्रीण असल्याने शाळा सुटल्यानंतर फिरण्यासाठी शेततळ्याकडे गेल्या होत्या. त्यावेळी, तिन्हीही मुली शेततळ्यात साचलेल्या पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे. 

हेही वाचा

महादेव बेटिंग ॲपप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यास अटक; सामान्य युवकाचा रुबाब, गाड्या, VIP वागणूक होती चर्चेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक

व्हिडीओ

Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
Burkha in Local Train : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Special Report
ZP Election Election : जिंकली लोकशाही, आजी नववधूच्या बोटाला शाई Special Report
Zp Election Voting Politics : मतदानाचा 'पोर'खेळ, लोकशाहीचा खेळ? Special Report
Pawar Family Together : पार्थ पवार- शरद पवारांचे एकत्र फोटो पाहून राजकीय चर्चेला उधाण Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
Embed widget