Department of Health : आरोग्य विभागातील 22 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदल्यांना 24 तासातच स्थगिती
आरोग्य विभागातील (Department of Health) 22 अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि बदल्यांना आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी 24 तासात स्थगिती दिली आहे.
Department of Health : आरोग्य विभागातील (Department of Health) 22 अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि बदल्यांना आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी 24 तासात स्थगिती दिली आहे. राज्यातील जिल्हा शाल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच विशेष तज्ज्ञ संवर्गातील 22 अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, या आदेशाला 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या अभियानाचे कारण देत स्थगिती देण्यात आली आहे. अधिकारी रुजू होण्याआधीच या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्यानं आरोग्य विभागातील गोंधळ समोर आला आहे.
आरोग्य विभागाने केलेल्या 22 अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदल्यांचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला आरोग्य मंत्र्यानी 24 तासात स्थगिती दिली आहे. राज्यातील जिल्हा शाल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व विशेष तज्ज्ञ संवर्गातील 22 अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, याच आदेशाला माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाचे कारण देत स्थगिती देण्यात आली आहे. राज्यातील 17 अधिकाऱ्यांना सहसंचालक उपसंचालक तर पाच जणांना जिल्हा शालेय चिकित्सक म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. अशा एकूण 22 अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, हे अधिकारी रुजू होण्याआधीच या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्यानं आरोग्य विभागातील गोंधळ समोर आला आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान सुरू झाले होते. परंतू, महिलांचा अल्प प्रतिसाद पाहता याला दिवाळीपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतरही कमीच तपासणी झाली. पुन्हा 15 नोव्हेंबरपर्यंत याला मुदतवाढ दिली. आता हे अभियान संपण्यास दोन दिवस बाकी असून त्यातही एका रविवारचा समावेश आहे. मग सोमवारी अभियान संपत असतानाही कारण देऊन बदल्यांना स्थगिती देण्यामागचा उद्देश काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
काय आहे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान
घरातील स्त्री आपल्या कुटुंबासाठी विविध भूमिका अदा करत असताना तिचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. कुटुंबाप्रती असणारी प्रेमाची भावना, मातृत्वाचा ओलावा आणि आपल्या कर्तव्याप्रती असणारी संवेदनशीलता यामुळं ती घरासाठी राबते, प्रसंगी स्वत:च्या गरजा, भावना, शरीर, प्रकृती याकडे लक्ष देत नाही. कुटुंबाची काळजी घेणाऱ्या माता-भगिनिंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य शासनाने नवरात्रीच्या निमित्ताने 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' हे अभियान हाती घेतलं होतं. राज्यातील 18 वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रीया यांच्या आरोग्य तपासणीसाठी 26 सप्टेंबरपासून अभियानाला सुरूवात झाली आहे. येत्या पाच ऑक्टोबरपर्यंत जरी अभियान कालावधी असला तरी राज्यातील सर्व महिलांची आरोग्य तपासणी होईपर्यंत अभियान सुरू ठेवण्याचा निर्धार आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी व्यक्त केला होता. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राबविण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: