एक्स्प्लोर

स्वामी रामगिरी महाराजांचे आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावरुन काढून टाका; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना आदेश

Mumbai High Court On Mahant Ramgiri Maharaj : मोहम्मद पैगंबरांबाबत आक्षेपार्ह विधानं केल्याबद्दल स्वामींविरोधात राज्यभरात 58 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

मुंबई : स्वामी रामगिरी महाराजांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावरुन काढून टाका, असे थेट आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांना दिले आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबरांबाबत चुकीचं विधान केल्याचा आरोप स्वामी रामगिरी महाराजांवर आहे.

काय आहे प्रकरण? 

स्वामी रामगिरी महाराज यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे मोहम्मद पैगंबर व मुस्लिम समाजाची बदनामी होत आहे. मुंबई पोलीस आयुक्त व कांदिवली पोलिसांकडे याची रितसर तक्रार करण्यात आली. मात्र पोलीस काहीच कारवाई करत नाही. तेव्हा न्यायालयानंच याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश देत सोशल मीडियावरुन हे व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करत अमिन इद्रीसी यांनी यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. स्वामी रामगिरी महाराजांच्या आक्षेपार्ह विधानांमुळे दोन समाजात जातीय तेढ निर्माण होत आहे. त्याने सामाजिक सलोखा बिघडून गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असा दावा याचिकाकर्त्यांचे वकील एजाज नख्वी यांनी केला. त्याची गंभीर दखल घेत हायकोर्टानं हे व्हिडिओ तात्काळ हटवण्याचे आदेश देत पुढील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.

स्वामी रामगिरी महाराज यांच्या व्हिडिओवर आक्षेप घेत राज्यभरात एकूण 58 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी नोंदवलेले हे गुन्हे एकत्रित करुन सिन्नर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेत, अशी माहिती सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी यावेळी खंडपीठाला दिली. त्याची नोंद करुन घेत या तपासासाठी सायबर सेलची मदत घ्या, अशी सूचना हायकोर्टानं मुंबई पोलिसांना केलीय.

ही बातमी वाचा : 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Salim Khan  Threat : सलमानच्या वडिलांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावे अज्ञात महिलेची धमकीJay Malokar Brother : जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं, भावाची प्रतिक्रिया काय?Antarwali Sarati Strike : आंतरवाली सराटीत तीन आंदोलन, मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवसMahayuti Vidhansabha Seat : जवळपास जागा निकाली, 138 जागांंचा महायुतीचा तिढा जवळपास सुटला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Embed widget