एक्स्प्लोर
मनसेकडून औरंगाबादचा उल्लेख 'संभाजीनगर'; महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी?
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरात लावलेल्या बॅनरवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर, असा करण्यात आलाय.
औरंगाबाद : शहरामध्ये राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर मनसेकडून पहिल्यांदाच संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे शिवसेनेच्या हातातून औरंगाबाद की संभाजीनगर हा मुद्दा राज ठाकरे महानगरपालिकेच्या निवडणुकीत वापरतील याचेही संकेत दिसतायेत. रविवारी मनसेने पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मुंबईत भव्य मोर्चा काढला होता. हा मोर्चा म्हणजे एक प्रकारचे शक्ती प्रदर्शन होते, असंही बोलले जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे औरंगाबाद शहरामध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागताचे बॅनर शहरात लावण्यात आले आहेत. या बॅनरवर मनसेकडून पहिल्यांदाच संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे शिवसेनेच्या हातातून औरंगाबाद की संभाजीनगर हा मुद्दा राज ठाकरे महानगरपालिकेच्या निवडणुकीत वापरतील याचेही संकेत दिसतायेत. याबरोबरच राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदूत्व नायक असादेखील शहरात लावलेल्या बॅनरवर मनसेकडून करण्यात आला आहे.
गेल्या दोन दशकात इतर पक्षांनी कसा केला राज ठाकरेंचा राजकीय वापर
औरंगाबाद पालिकेसाठी मनसेची मोर्चबांधणी -
औरंगाबाद महापालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ही निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी मनसे संभाजीनगर हा मुद्दा या निवडणुकीत घेण्याचे मनसेने संकेत दिलेत.
भविष्यात भाजपसोबतही मनसे जाऊ शकते, बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट
महाविकासआघाडी औरंगाबाद महानगरपालिका एकत्रित लढणार -
औरंगाबाद महानगरपालिका महाविकास आघाडी अंतर्गत लढण्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये एकमत झालंय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक यासंदर्भात बैठक झाली आहे. जिंकलेल्या जागा वगळून इतर जागांवरवर चर्चा करण्यावरही तीनही पक्षांमध्ये एकमत झालेलं आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हरलेल्या जागांमध्ये ज्या पक्षाला सर्वाधिक मते ती जागा त्या पक्षाला मिळणार असल्यचा फॉर्म्युला राबवणार असल्यावर एकमत झाल्याची माहिती शिवसेनेचे औरंगाबादेतील आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिका महाविकास आघाडी अंतर्गतच लढली जाणार असल्याचं आता स्पष्ट झाले आहे.
VIDEO | औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करावं, हर्षवर्धन जाधवांची राज ठाकरेंकडे मागणी | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement