एक्स्प्लोर

राजू शेट्टींचा धसका, गुजरातवरुन येणारी दुधाची ट्रेन रद्द!

गुजरातमधून महाराष्ट्राला होणारी दुधाची रसद रोखण्यासाठी राजू शेट्टी कालपासून डहाणू इथं तळ ठोकून होते. मात्र आज गुजरातमधून दुधाचे टँकर आलेच नाहीत.

पालघर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या दूध दर आंदोलनाचा धसका गुजरातमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आहे. कारण आज गुजरातमधून येणारी दुधाची ट्रेन रद्द करण्यात आली. गुजरातमधून महाराष्ट्राला होणारी दुधाची रसद रोखण्यासाठी राजू शेट्टी कालपासून डहाणू इथं तळ ठोकून होते. मात्र आज गुजरातमधून दुधाचे टँकर आलेच नाहीत. दूध उत्पादकाला 5 रुपयांचं अनुदान मिळावं यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हाती घेतलेल्या दूध आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मुंबईत जरी जास्त परिणाम जाणवत नसला तरी तिकडे राज्यभर आंदोलन हिंसक होताना दिसतंय. आता या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी देखील आक्रमक झालेत. उद्यापासून जनावरं घेऊन महामार्ग रोखणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली. तसंच मुलं-बाळं, महिलांना घेऊन पोलिस स्टेशनला जाऊन बसणार, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. पुण्यात तुटवडा दूध आंदोलनाचा मुंबईत अजूनही फारसा परिणाम जाणवत नसला तरी पुण्यात मात्र दुधाचा तुटवडा भासणार आहे. कारण, आज चितळे आणि कात्रज या पुण्यातल्या मोठ्या दूध डेअऱ्यांचं संकलन होणार नाहीय. त्यामुळे पुण्यात दुधाची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. पुण्याकडे येणाऱ्या दुधाच्या गाड्या आडवल्या जात आहेत. जालन्यात दूध रस्त्यावर तर तिकडे जालन्यात स्वाभिमानीच्या शेतकऱ्यांनी दूध कोंडी केली. आणि रस्त्यावर दूध फेकून दिलंय. जालना औरंगाबाद रोडवरच्या नागेवाडी इथं 4 हजार लीटर दूध फेकून देण्यात आलंय. आणि  कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यात दूध दर आंदोलन काल रात्री आणखी तीव्र झालं.  जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरात गोकूळ दुधाचा टँकर आंदोलकांनी पेटवला. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget