एक्स्प्लोर

Guillain Barre Syndrome: हातापायाला लकवा मारला, श्वास गुदमरला, GBS ने नागपुरात 45 वर्षीय रुग्ण दगावला, काय काळजी घ्याल?

गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain barre syndrome) या मेंदू विषयक आजाराच्या रुग्ण संख्येने 200 चा टप्पा ओलांडला आहे. राज्यात 13 फेब्रुवारी रोजी जीबीएसची रुग्णसंख्या 203 एवढी होती.

Nagpur: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain barre syndrome)रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पुण्यात जीबीएसने थैमान घातलं असून आत्तापर्यंत 8 जणांचा बळी गेलाय. नागपुरातही जीबीएसचा कहर वाढताना दिसतोय. नागपूरच्या पारडी शिवारात राहणाऱ्या 45 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी जीबीएसमुळे मृत्यू झाला. (Nagpur)या रुग्णाला 11 फेब्रुवारीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णाच्या दोन्ही हातापायाला लकवा मारला होता. श्वास घेण्यासही त्रास होत होता. शिवाय रक्तदाबाचा हे त्रास असल्याने प्रकृती अधिक बिघडल्याने शुक्रवारी सायंकाळी शासकीय रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये रूग्ण दगावला.
दरम्यान नागपुरात आणखीन 2 रुग्ण सध्या आयसीयूमध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमवर उपचार घेत आहेत. (GBS)

गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain barre syndrome) या मेंदू विषयक आजाराच्या रुग्ण संख्येने 200 चा टप्पा ओलांडला आहे. राज्यात 13 फेब्रुवारी रोजी जीबीएसची रुग्णसंख्या 203 एवढी होती. पुण्यानंतर कोल्हापूर आणि नागपुरातही जीबीएसच्या रुग्णांची संख्या वाढती असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही असे वारंवार प्रशासन आणि राज्य सरकारकडून सातत्याने सांगितले जात आहे. 

 गुलेन बॅरी सिंड्रोमची लक्षणे

  • अचानक हातापायातील त्राण जाणे .अशक्तपणा दुर्बलता किंवा लकवा बसणे
  • अचानक चालताना अशक्तपणा आणि त्रास उद्भवणे
  • जास्त दिवसांचा अतिसार (डायरिया ) आणि ताप

नागरिकांनी काय काळजी घ्यावी ?

  • पिण्याचे पाणी उकळून प्यावे
  • स्वच्छ व ताजे अन्न खावे
  • शिजलेले अन्न आणि न शिजलेले कच्चे अन्न एकत्रित ठेवू नये
  • वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा
  • हात किंवा पायामध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा

गुलेन बॅरी सिंड्रोम म्हणजे काय ?

गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मीळ आजार आहे, ज्यामध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती चुकून स्वतःच्याच स्नायू आणि मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे स्नायू कमजोर होतात, आणि काही गंभीर रुग्णांमध्ये पूर्णपणे पक्षाघात होण्याचीही शक्यता असते. महत्त्वाचं म्हणजे, GBS हा संसर्गजन्य आजार नाही. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होत नाही. याचे नक्की कारण अजूनही स्पष्ट नाही, पण तो बहुतेकदा श्वसन किंवा पचनसंस्थेच्या संसर्गानंतर विकसित होतो. त्यामुळे त्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे असते. हा आजार काही नवीन नाही. तो अनेक वर्षांपासून ओळखला जात आहे. जरी तो संसर्गजन्य नसला, तरी काही वेळा जीवाणू किंवा विषाणूच्या संसर्गानंतर दिसून येतो. GBS चे इतरही काही संभाव्य कारणे आहेत. हा आजार वर्षभर आढळतो आणि अंदाजे 1 लाख लोकांमध्ये एखादृयाला बाधताे. त्यामुळे मोठ्या शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये दर महिन्याला GBS चे काही रुग्ण उपचारासाठी येतात. GBS च्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण वेळीच उपचार झाल्यास रुग्णाला गंभीर अवस्थेत जाण्यापासून वाचवता येऊ शकते.

हेही वाचा:

विदर्भात विकासाची योजना तयार, ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटीही होणार, सर्वांनी सहभागी व्हावं, गडकरींचं आवाहन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
Auto Rickshaw Permit : मोठी बातमी: राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना ब्रेक, आजपासून परवाने स्थगित; प्रताप सरनाईकांचा निर्णय
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना ब्रेक, आजपासून परवाने स्थगित; प्रताप सरनाईकांचा निर्णय
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान

व्हिडीओ

Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Devendra Fadnavis On T 20 World Cup : मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचं कौतुक
Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Embed widget