एक्स्प्लोर

Gudi Padwa 2022 : यंदा पुणे, मुंबईकरांना गुढीपाडव्यासाठी घ्याव्या लागणार गुजराती गाठी, पंढरपूरमध्ये साखर हारांचे उत्पादन कमी झाल्याचा परिणाम

Gudi Padwa 2022 : यंदाच्या वर्षी गुढीला लागणारे नक्षीदार साखरेचे हार तयार करणाऱ्या फक्त चार भट्ट्या सुरु झाल्याने यंदा मोठ्या शहरात पंढरपुरी साखरेचे हार पोहोचू शकणार नाहीत.

Maharashtra News : गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2022) सण अवघ्या काही दिवसांवर आहे. याच दरम्यान महाराष्ट्रभर सणाचा उत्साह आणि रेलचेल पाहायला मिळतेय. कोरोना काळात सणांवर काहीसं सावट असतानाच यंदा दोन वर्षानंतर गुढी पाडव्याचा सण राज्यभर निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत आहे. त्यामुळे एकीकडे उत्साहाचे वातावरण असतानाच दुसरीकडे मात्र नागरिकांमध्ये निराशा पाहायला मिळतेय. यंदाच्या वर्षी गुढीला लागणारे नक्षीदार साखरेचे हार तयार करणाऱ्या फक्त चार भट्ट्या सुरु झाल्याने यंदा मोठ्या शहरात पंढरपुरी साखरेचे हार पोहोचू शकणार नाहीत.

गुढी पाडव्याला लागणारे हे साखरेचे हार अर्थात गाठी या पंढरपूर मधून मोठ्या शहरात पुणे मुंबई येथे जात असतात. पांढरे शुभ्र आणि अतिशय पातळ पदक असणारे पंढरपुरी साखरेच्या हारांना मोठ्या शहरात मोठी मागणी असते. यासाठी पंढरपूर मध्ये 12 ते 15 कारखान्यातून हे साखरेचे हार लाकडी साच्यातून बनविण्यात येत असतात. मात्र, जगभर दहशत निर्माण करणाऱ्या कोरोनाच्या भीतीने बाहेरचे कामगार यंदा पंढरपूरमध्ये न पोहोचू शकल्याने यंदा गुजरात येथील साखरेच्या हारावरच आता महाराष्ट्रात अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. पंढरपूर मध्ये दरवर्षी किमान 300 टन सुबक साखरेचे हार बनविले जातात. पण, यंदा कामगार प्रश्नामुळे केवळ 20 टक्के एवढाच माल तयार झाला आहे. त्यामुळे काळपट रंगाचे आणि जाड पदके असलेले गुजराती साखरेचे हार सध्या बाजारात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे पुणे, मुंबईकरांनादेखील यंदा या गुजराती साखरेच्या हारावर आपला गुढी उभारावा लागणार आहे. पाडव्यासाठी झेंडू फुलांनादेखील मोठे महत्व असल्याने बाजारात झेंडूदेखील मोठ्या प्रमाणात बाजारात येऊ लागला आहे. सध्या झेंडूला 40 ते 50 रुपये एवढा भाव मिळत असल्याने बळीराजाचा गुढी पाडवा चांगला होणार आहे. 

गुढीपाडवा 2022 :

नवीन हिंदू वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते. याबरोबरच चैत्र नवरात्री आणि गुढीपाडवा हा सण या दिवशी साजरा केला जातो. गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो.  त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा महत्त्वाचा शुभ मानला जातो.  गुढीपाडव्याला पछडी, उगादी आणि संवत्सरा पाडो असेही म्हणतात. 

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India vs Australia 3rd Test : जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
छगन भुजबळांबद्दल वाईट वाटलं, ते अधून-मधून माझ्या संपर्कात; नागपुरातून उद्धव ठाकरेंनी टाकली गुगली
छगन भुजबळांबद्दल वाईट वाटलं, ते अधून-मधून माझ्या संपर्कात; नागपुरातून उद्धव ठाकरेंनी टाकली गुगली
Ajinkya Rahane: टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल
टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल
Stock Market Crash : शेअर मार्केट भूकंप, सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला, निफ्टीचं काय झालं?
बँकिंग क्षेत्राला जोरदार फटका, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, निफ्टीचं नेमकं काय झालं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Full PC : ....नाहीतर या आंदोलनात माझा अंतही होऊ शकतो - मनोज जरांगेUddhav Thackeray Full PC : विजयाच्या फटाक्यांपेक्षा नाराजीचे बार अधिक वाजले - उद्धव ठाकरेSuresh Dhas speech Vidhan sabha:  टूंग वाजलं की म्हातारं जातंय,पैसे काढतंय, सभागृहात धडाकेबाज भाषणBhaskar Jadhav vs Vikhe : राज्यपालांच्या अभिभाषणावरुन खडाजंगी; विखे-भातखळकरांना, भास्कर जाधव भिडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Australia 3rd Test : जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
छगन भुजबळांबद्दल वाईट वाटलं, ते अधून-मधून माझ्या संपर्कात; नागपुरातून उद्धव ठाकरेंनी टाकली गुगली
छगन भुजबळांबद्दल वाईट वाटलं, ते अधून-मधून माझ्या संपर्कात; नागपुरातून उद्धव ठाकरेंनी टाकली गुगली
Ajinkya Rahane: टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल
टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल
Stock Market Crash : शेअर मार्केट भूकंप, सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला, निफ्टीचं काय झालं?
बँकिंग क्षेत्राला जोरदार फटका, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, निफ्टीचं नेमकं काय झालं?
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना जे मिळालंय ते पक्षामुळेच मिळालंय, अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारणं योग्य नव्हतं: अनिल पाटील
छगन भुजबळांना जे मिळालंय ते पक्षामुळेच मिळालंय, अजितदादांच्या फोटोला जोडे.... राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray : लाडकी बहीणसाठी आताच निकष का? उद्धव ठाकरेंचा सवाल, भुजबळांबद्दल वाईट वाटतंय, ठाकरेंचा टोला
लाडकी बहीणसाठी आताच निकष का? उद्धव ठाकरेंचा सवाल, भुजबळांबद्दल वाईट वाटतंय, ठाकरेंचा टोला
Bajrang Sonwane: बजरंग बाप्पांनी संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी संसदेत रान उठवलं; गंभीर आरोपांची राळ, पोलीस PSI बदलण्याची मागणी
बजरंग बाप्पांनी संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी संसदेत रान उठवलं; गंभीर आरोपांची राळ, पोलीस PSI बदलण्याची मागणी
Gold Rate Today : सोने चांदी दरात दुसऱ्या दिवशी घसरण, लग्नसराई संपताच दर घसरण्यास सुरुवात,सोने खरेदी करताना काय काळजी घ्यायची?
सोने चांदी दरात दुसऱ्या दिवशी घसरण, लग्नसराई संपताच दर घसरण्यास सुरुवात, सोने खरेदी करताना काय काळजी घ्यायची?
Embed widget