एक्स्प्लोर
शेवटची अक्षता पडताना भर मंडपात नवरदेवाचा मृत्यू

पंढरपूर : लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या नवरदेवाचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. शैलेंद्र शिवाजी शिंदे असे या नवरदेवाचं नाव आहे. लग्नात शेवटची अक्षता पडताना शैलेंद्र शिवाजी शिंदे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. पंढरपूर तालुक्यातील देगाव जवळील शिंदे वस्तीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. पारण्याच्या वेळेस वऱ्हाड मंडळीत दोन गटात भांडण झालं होतं. त्या तणावामुळेच शैलेंद्र शिंदेंचा मृत्यू झाल्याचा आरोप नवरदेवाच्या नातेवाईकांनी केला आहे. शैलेंद्र यांना हृदयविकाराचा धक्का भांडणांच्या तणावामुळे आला की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबत अद्याप पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
Before You Go
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















