एक्स्प्लोर

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचं अनुदान, शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा 

Maharashtra Cabinet : जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात त्यांना 50 हजार रुपयांचा अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Maharashtra Cabinet : राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय आज घेतला आहे. जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात त्यांना 50 हजार रुपयांचा अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिंदे यांनी सांगितलं की, नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचं अनुदान देण्याची मागणी काही लोकप्रतिनिधींनी केली होती. तसेच शेतकऱ्यांनी देखील ही मागणी केली होती. लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. 

नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत  खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन लाखों शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

या निवेदनाच्या अनुषंगाने जाचक अटी  रद्द करून राज्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच सांगितलं होतं. 

आमदार प्रकाश आबिटकर आणि खासदार धैर्यशील माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होतं की, महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने लावलेले नियम जाचक आहेत. 2018-19 मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले  आहे. त्यामुळे राज्यातील लाखों शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. याशिवाय या योजनेत 2017-18, 2018-19, 2019-20 या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे. या निकाशत राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँका यांचे आर्थिक वर्ष  वेगेवेगळे असल्याने शेतकऱ्यांना त्याचा  लाभ होणार नाही असे म्हटले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे नऊ निर्णय वाचा एका क्लिकवर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकव्याप्त काश्मीर पेटला! तब्बल 25 पाकिस्तानी सैनिकांना ओलीस ठेवलं; लष्कराची सुद्धा नाकांबदी केली, आंदोलनात 10 ठार, 100 जखमी
पाकव्याप्त काश्मीर पेटला! तब्बल 25 पाकिस्तानी सैनिकांना ओलीस ठेवलं; लष्कराची सुद्धा नाकांबदी केली, आंदोलनात 10 ठार, 100 जखमी
यंदा दसऱ्याला सोनं 1 लाख 21 हजारांवर, गेल्या वर्षी दसऱ्यात सोने दर किती होता ?
यंदा दसऱ्याला सोनं 1 लाख 21 हजारांवर, गेल्या वर्षी दसऱ्यात सोने दर किती होता ?
Pune News : सारसबाग परिसरातील महालक्ष्मी देवीला नेसवली तब्बल 16 किलो सोन्याची साडी, सुवर्णवस्त्रातील महालक्ष्मीचं मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
सारसबाग परिसरातील महालक्ष्मी देवीला नेसवली तब्बल 16 किलो सोन्याची साडी, सुवर्णवस्त्रातील महालक्ष्मीचं मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Thane Crime : मी इकडचा भाई, माझ्याकडून गरब्याची परवानगी घेतली का? ठाण्यात कार्यक्रमामध्येच शिंदेंच्या शाखाप्रमुखावर बंदूक रोखली अन्...
मी इकडचा भाई, माझ्याकडून गरब्याची परवानगी घेतली का? ठाण्यात कार्यक्रमामध्येच शिंदेंच्या शाखाप्रमुखावर बंदूक रोखली अन्...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100th Foundation Day : हेडगेवार ते भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष; पाहा संपूर्ण प्रवास
RSS Centenary Celebrations | नागपूरच्या Reshimbag मध्ये 21 हजार स्वयंसेवकांचे प्रात्यक्षिक, जय्यत तयारी
Kamaltai Gawai संघाच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई जाणार नाहीत
Bhagwangad Land | भगवानगड ट्रस्टला 4 हेक्टर वन जमीन, CM Fadnavis यांची घोषणा
Ravindra Dhangekar निलेश घायवळ प्रकरणावरुन चंद्रकांत पाटील गप्प का? रवींद्र धंगेकरांचा सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकव्याप्त काश्मीर पेटला! तब्बल 25 पाकिस्तानी सैनिकांना ओलीस ठेवलं; लष्कराची सुद्धा नाकांबदी केली, आंदोलनात 10 ठार, 100 जखमी
पाकव्याप्त काश्मीर पेटला! तब्बल 25 पाकिस्तानी सैनिकांना ओलीस ठेवलं; लष्कराची सुद्धा नाकांबदी केली, आंदोलनात 10 ठार, 100 जखमी
यंदा दसऱ्याला सोनं 1 लाख 21 हजारांवर, गेल्या वर्षी दसऱ्यात सोने दर किती होता ?
यंदा दसऱ्याला सोनं 1 लाख 21 हजारांवर, गेल्या वर्षी दसऱ्यात सोने दर किती होता ?
Pune News : सारसबाग परिसरातील महालक्ष्मी देवीला नेसवली तब्बल 16 किलो सोन्याची साडी, सुवर्णवस्त्रातील महालक्ष्मीचं मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
सारसबाग परिसरातील महालक्ष्मी देवीला नेसवली तब्बल 16 किलो सोन्याची साडी, सुवर्णवस्त्रातील महालक्ष्मीचं मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Thane Crime : मी इकडचा भाई, माझ्याकडून गरब्याची परवानगी घेतली का? ठाण्यात कार्यक्रमामध्येच शिंदेंच्या शाखाप्रमुखावर बंदूक रोखली अन्...
मी इकडचा भाई, माझ्याकडून गरब्याची परवानगी घेतली का? ठाण्यात कार्यक्रमामध्येच शिंदेंच्या शाखाप्रमुखावर बंदूक रोखली अन्...
सरकार विरोधातील असंतोषासाठी रस्त्यावर उतरून हिंसा योग्य नाही, लोकशाही मार्गानेच बदल शक्य : मोहन भागवत
सरकार विरोधातील असंतोषासाठी रस्त्यावर उतरून हिंसा योग्य नाही, लोकशाही मार्गानेच बदल शक्य : मोहन भागवत
Sanjay Raut on RSS: स्वातंत्र्यलढ्यात काय योगदान दिलं? संघ हा विष आहे, असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते; गांधी-आंबेडकरांनी कधी संघाचं समर्थन केलं नाही; संजय राऊतांची बोचरी टीका
स्वातंत्र्यलढ्यात काय योगदान दिलं? संघ हा विष आहे, असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते; गांधी-आंबेडकरांनी कधी संघाचं समर्थन केलं नाही; संजय राऊतांची बोचरी टीका
New York Plane Accident : विमानतळावर भीषण अपघात; दोन विमानांची जोरदार धडक, एकाचं नाक तर दुसऱ्याचं पंख तुटलं!
विमानतळावर भीषण अपघात; दोन विमानांची जोरदार धडक, एकाचं नाक तर दुसऱ्याचं पंख तुटलं!
मध्यरात्री रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली अज्ञातांनी रिक्षाचालकाला भोसकले, जागेवर प्राण गेला ; संभाजीनगरातील थरार
मध्यरात्री रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली अज्ञातांनी रिक्षाचालकाला भोसकले, जागेवर प्राण गेला ; संभाजीनगरातील थरार
Embed widget