एक्स्प्लोर

मध्यरात्री रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली अज्ञातांनी रिक्षाचालकाला भोसकले, जागेवर प्राण गेला ; संभाजीनगरातील थरार

Sambhajinagar Crime:सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत .हत्या नेमकी कशामुळे झाली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे .पुढील तपास सुरू आहे .

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर शहरात वारंवार गुन्हेगारी घटना समोर येत असून शहरातील सर्वात गजबजलेल्या रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ( 1 ऑक्टोबर ) थरकाप उडवणारी घटना घडली आहे. रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली एका तरुणाला धारदार शस्त्राने वार करून जागेवर संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींचा शोध सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने घेतला जात आहे. (Crime news)

इमरान शेख हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रिक्षा चालक म्हणून काम करणारा हा तरुण बुधवारी रात्री संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली थांबला होता.  त्यावेळी चारचाकीतून आलेल्या दोघांनी त्याला गाठलं. कोयत्याने त्याच्यावर वार करत त्याची निर्घृण हत्या केली.

Sambhajinagar Crime: नेमके प्रकरण काय ?

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील उड्डाणपुलाखाली घडली आहे . शहरातील सर्वात गजबजलेला भाग म्हणून हा परिसर ओळखला जातो . 1 ऑक्टोबरला रात्री उशिरा ही घटना घडली आहे .इमरान शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून हा तरुण शहरात रिक्षा चालक आहे .बुधवारी रात्री संभाजीनगरच्या रेल्वे स्थानक परिसरातील उड्डाणपुलाखाली इमरान आला होता .त्यावेळी कारमधून आलेल्या दोन अज्ञान व्यक्तींनी त्याला गाठलं .हातातील धारदार कोयत्याने वार करत त्याच्यावर हल्ला चढवला . अचानक झालेल्या हल्ल्यात रिक्षाचालक क्षणार्धात कोसळला . हल्ला केल्यानंतर आरोपी कारमधून पसार झाले .या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला होता .स्थानिकांनी घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली .त्यानंतर घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी परिसराची पाहणी करत पंचनामा केला .पुढील तपासासाठी मृतदेह घाटी रुग्णालयात हलवण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत .हत्या नेमकी कशामुळे झाली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे .पुढील तपास सुरू आहे .

हेही वाचा

Chhatrapati Sambhajinagar: आधी अपहरण, दौलताबाद घाटात रुमालाने गळा आवळून वर्धनला संपवलं, 8 वर्षांनंतर आरोपींना जन्मठेप  कायम

महत्त्वाच्या बातम्या

बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
Pune Crime News : अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget