Agriculture News : हरभऱ्याला शासनाचा 5 हजार 335 रुपयांचा हमीभाव, तर खुल्या बाजारात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक
Agriculture News : हरभऱ्याला शासनाचा हमीभाव 5 हजार 335 रुपये इतका आहे. तर खुल्या बाजारात याच हरभऱ्याला व्यापारी कमी भाव मिळत आहे.
Agriculture News : हरभऱ्याला शासनाचा हमीभाव 5 हजार 335 रुपये इतका आहे. तर खुल्या बाजारात याच हरभऱ्याला व्यापारी कमी भाव देत आहेत. खुल्या बाजारात हरभरा 4 हजार 300 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना जवळपास एक हजार रुपयांचा फटका बसत आहे. नाफेडच्या वतीनं ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही काही ठिकाणी खरेदी सुरु झाली नाही. त्यामुळं शेतकरी खुल्या बाजारात हरभरा विकत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय.
यावर्षी राज्यात 29 लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड
Gram Crop : राज्यभरात यावर्षी 29 लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड राज्यभरात यावर्षी 29 लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून हरभरा कढणीची लगबग सुरु आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी तर हरभऱ्याची काढणी केली आहे.
दरवर्षी नाफेडच्या माध्यमातून हरभऱ्याची खरेदी
दरवर्षी, नाफेडच्या माध्यमातून राज्यात विविध राज्य अभिकर्ता संस्थेकडून किमान हमी दरानुसार शेतीमाल खरेदी केला जाते. यामध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, तांदूळ, कापूस, हरभरा पिकांचा समावेश असतो. सध्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची काढणी केली आहे. मात्र, नाफेडकडून अद्याप काही ठिकाणी खरेदी केंद्र सुरु झाली नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं शेतकरी खुल्या बाजारात हरभऱ्याची कमी दराने विक्री करत आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
नोंदणी करण्यासाठी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा
हरभऱ्याचा हमीभाव 5 हजार 300 असल्याने शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी खरेदी केंद्रावर रांगा लावल्या होत्या. सध्या शेतकऱ्यांकडे हरभरा घरात पडून आहे. बाजारात 4 हजार 200 ते 4 हजार 400 रुपये दर मिळत असल्याने सगळ्या शेतकऱ्यांचा कल नाफेडकडे आहे. कारण नाफेडचे हमीभाव हे 5 हजार 300 रुपये असल्याने प्रत्येक शेतकरी आपला हरभरा याठिकाणीच विकण्यासाठी येत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची नोंदणीसाठी खरेदी केंद्रावर गर्दी होत आहे. अमरावती जिल्ह्यात लोकांची गर्दी झाल्याने शेतकऱ्यांना चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याचे प्रकार सुद्धा समोर आले होते.
सध्या राज्यातील शेतकरी विविध संकटात सामना करत आहेत. कांदा दराचा प्रश्नही ऐरणीवर ला आहे. दरात घसरण झाल्यामुळं शेतकरी चिंतेत सापडला आहे. प्रतिक्विंटल 400 ते 500 रुपयांचा दर कांद्याला मिळत आहे. त्यामुळं सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावं असी मागणी केली जात आहे. तसेच हवामानात सातत्यानं बदल होत आहे. या बदलाचा देखील शेती पिकांवर परिणाम होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: