Gram Panchayat Election Results | अनेक ग्रामपंचायतीत प्रस्थापितांना धक्का; नवख्यांच्या हाती सत्ता, महाविकास आघाडीची बाजी
अटीतटीची निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती कंडारी, चिंचपूर ( बु ) लोणी, आनाळा, पाचपिपळा, कुंभेफळ, इनगोंदा , गोसाववाडी , रोहकल, कौडगाव , भांडगाव , जवळा ( नि) देऊळगाव , कात्राबाद या ग्रामपंचायतीत प्रस्थापितांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे .

उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील 65 ग्रामपंचायतीचे 479 जागांसाठी 1 हजार 50 उमेदवार निवडणुकीत उभे होते. तालुक्यात महाविकास आघाडीचे पॅनल यशस्वी ठरले आहे अनेक ग्रामपंचायतीत शिवसेना , राष्ट्रवादी आघाडी करुन लढविण्यात आल्या त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या झाल्या.
अटीतटीची निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती कंडारी, चिंचपूर ( बु ) लोणी, आनाळा, पाचपिपळा, कुंभेफळ, इनगोंदा , गोसाववाडी , रोहकल, कौडगाव , भांडगाव , जवळा ( नि) देऊळगाव , कात्राबाद या ग्रामपंचायतीत प्रस्थापितांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे.
आनाळ्याचे राष्ट्रवादीचे नेते दत्ता पाटील यांची वर्षानुर्षेची सत्ता मतदारांनी उलथवून टाकली आहे. कंडारी ग्रामपंचायतीचे राष्ट्रवादीचे विद्यमान सरपंच विश्वास मोरे यांच्या पॅनलचा शिवसेना युवा नेते किरण डोके पॅनलने धुव्वा उडविला. आवार पिंपरीत शिवसेनेचे तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गौतम लटके यांना गावाची सत्ता आणता आली नाही . कॉंग्रेसचे माजी कृषी सभापती रणजीत पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अॅड दादासाहेब खरसडे , भाजपाचे तालुकाध्यक्ष सुखदेव टोंपे यांना देखील ग्रामपंचायतीचा सत्ता राखता आली नाही. मतदारांनी त्यांना सत्तेपासून दूर ठेवले आहे.
संबंधित बातम्या :
Gram Panchayat Election 2021 Results: ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
पंढरपुरातल्या देवडेत 85 वर्षांच्या कलावती आज्जींची व्हिक्ट्री, विजयानंतर म्हणाल्या...
GramPanchayat Election Results 2021 : सिंधुदुर्गात राणेंचं वर्चस्व, भाजपाकडे 45 तर शिवसेनेचं 21 ग्रामपंचायतींवर वर्चस्व
पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात? मुलीच्या पराभवानंतर काय म्हणाले पेरे पाटील?महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
