(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत आधुनिक निवडणूक चिन्ह मात्र उमेदवारांकडून जुन्या चिन्हांना पसंती
निवडणूक आयोगाने 90 नवीन चिन्ह दिली असली तरी मात्र निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी पारंपारिक चिन्हांना जास्त पसंती दिल्याचं चित्र सध्या राज्यात आहे.
वाशीम : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये या बदलत्या काळात निवडणुकीचे चिन्हही बदलत गेले. काळानुसार निवडणूक आयोगाने 90 नवीन चिन्ह दिली असली तरी मात्र निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी पारंपारिक चिन्हांना जास्त पसंती दिल्याचं चित्र आहे.
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. सर्व पक्षाने आपआपले सर्वाधिक ग्रामपंचायत निवडून येण्याचा दावा केला असला तरी कोणत्याच पक्षाचं निवडणूक चिन्ह या निवडणुकीत दिसत नाही आणि ते येत्या काळात दिसणे शक्य नाही. मात्र कित्येक दशकापासून ओळखीचे असलेले निवडणूक चिन्ह घेतल्याच चित्र राज्यात सगळ्या भागात दिसत आहे. निवडणूक आयोगाने लॅपटॉप , पेनड्राइव्ह, हेडफोन, एसी, सीसीटीव्ही, क्रेन, संगणक, हेल्मेट, हेलिकॉप्टर, मशीन केक, गालिचा, ब्रेड टोस्टर यासारख्या आधुनिक काळातील निवडणूक चिन्हांना मान्यता दिली असली, तरी चिन्ह वाटपात उमेदवारांनी परंपरागत चिन्हांनाच पसंती दिल्याचे दिसून आले आहे.
अनेक उमेदवारांनी सिलेंडर, कपाट, टी.व्ही., कपबशी, फॅन, बस, शिलाई मशीन अशा दैनंदिन वापरातील वस्तूंच्या चिन्हांचीच निवड केल्याचे दिसून आले. दैनंदिन वापरातील वस्तूंची चिन्हे ग्रामीण भागातील जनतेच्या परिचयाची असल्याने उमेदवारांनी त्यां चिन्हांना पसंती दिल्याच चित्र आहे. बदलत्या काळाला अनुसरून यंत्रणा निवडणूक प्रक्रिया जरी हायटेक झाली असली तरी निवडणुकांमध्ये पक्षापेक्षा चिन्हांच एक वेगळ आकर्षण ग्रामीण महाराष्ट्रमध्ये दिसत आहे. हायटेक प्रचार प्रसाराबरोबर विकास आणि उमेदवार जर हायटेक झाला तर खऱ्या अर्थाने निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांना खर यश आलं असे म्हणावे लागेल.
दैनंदिन वापरातील हेल्मेट, नेलकटर, मिक्सर, माइक, दुर्बीण, कढई, ब्रेड टोस्टर, उशी, फ्रीज, स्टॅपलर, सेफ्टी पीन अशा घरगुती व स्वयंपाकघरातील वापराच्या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.सोबतच भेंडी, मका, वाटाणे, फुलकोबी, ढोबळी मिरची, आलं (अद्रक), हिरवी मिरची, अननस, कलिंगड, द्राक्षे, पेरू, नारळ अशा काही चिन्हांचाही समावेश करण्यात आला.
संबंधित बातम्या :
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, चार्जर, ब्रेड टोस्टर... उमेदवारांना मजेशीर चिन्हं!
Gram Panchayat Elections : आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अकलूजमध्ये पुन्हा मोहिते विरुद्ध मोहिते संघर्ष
Gram Panchayat Election : कोल्हापूरच्या पेरिडमध्ये 65 वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक
Nagpur Crime | ग्रामपंचायत निवडणूक, नागपूरच्या पेठ गावात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अपहरण