एक्स्प्लोर

इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग सुकर, सरकारकडून कायद्यात बदल

नवी मुंबई : राज्यासह नवी मुंबईसाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी 100 टक्के सभासदांचे संमतीपत्र घेण्याची अट आता 51 टक्क्यांवर आणली आहे. नवी मुंबईतील धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीकरिता अडीच चटई क्षेत्राचा अध्यादेश शासनाने जारी केला होता. मात्र दोन वर्षे उलटूनही केवळ सदनिकाधारकांची शंभर टक्के सहमती घ्यावी, या जाचक अटीमुळे पुनर्बांधणी प्रक्रिया रखडली होती. याबाबत शासन व न्यायालयीन स्तरावर लढा दिल्यानंतर आता लढ्याला यश आले आहे. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय अधिकारी बैठकीत 100  टक्के सदस्यांच्या सहमतीची अट शिथील करून ती 51 टक्के करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यासाठी हा निर्णय लागू असेल. नवी मुंबईत सिडकोने बांधलेल्या इमारती धोकदायक व मोडकळीस आल्या होत्या. या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी 100 टक्के असोसिएशनमधील सदस्यांची सहमती गरजेची होती. या जाचक अटींमुळे मोडकळीस आलेल्या इमारतींची पुनर्बांधणी रखडली होती. सोसायटीमधील सर्वच सदस्य तयार होत नसल्याने रहिवाशांना आपला जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारतींमध्ये दिवस काढावे लागत होते. या प्रकरणी नवी मुंबई क्रीडीया असोसिएशनने हा पश्न शासन दरबारी लावून धरला होता. तसेच 100 टक्केची अट शिथील करून ती 51 टक्केवर आणावी यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. अखेर या मागणीला यश येत मुख्यमंत्री सचिव कार्यालयात झालेल्या बैठकीत असोसिएशनमधील 51 टक्के सदस्यांनी पुनर्विकासाला पाठिॅबा दिल्यास धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी होऊ शकते या निर्णयावर शिक्कामोर्तब केले गेले. असोसिएशनबाबतचा हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू होणार आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी शहरातील जवळपास 12 ते 15 हजार असोसिएशनला याचा फायदा होणार आहे. या बैठकीला गृहनिर्माण खात्याचे वरिष्ठ सचिव, सहकार खात्याचे सचिव, नगरविकास खात्याचे सचिव, नवी मुंबई मनपा आयुक्त तसेच क्रीडीया असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट

व्हिडीओ

Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Embed widget