शिवसेना सत्तास्थापन करणार असेल तर भाजप विरोधात बसणार, सूत्रांची माहिती
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निमंत्रणाच्या संदर्भात चर्चा झाली. पुन्हा दुपारी 4 वाजता बैठक घेणार आहोत, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेबद्दल भाजपची कोअर कमिटीची बैठक आज पार पडली. शिवसेना सरकार स्थापन करत असेल तर भाजप विरोधी पक्षात बसणार असल्याचं ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अपक्षांची काही जुळवाजुळव होते का यासंदर्भात चर्चा झाली. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर अमित शाह यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती त्यांना देण्यात आली. भाजपची सध्याची स्थिती पाहता अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन होणे शक्य नाही. त्यामुळे शिवसेना सरकार बनवत असेल, तर भाजपची विरोधी पक्षात बसायची मानसिकता झाली आहे. दुपारी 4 वाजताच्या बैठकीत या सगळ्या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राज्यपालांनी भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. महाराष्ट्रातील 105 आमदार असलेला पक्ष म्हणून राज्यपालांनी आम्हाला निमंत्रण दिलं. कोअर कमिटीच्या बैठकीत निमंत्रणाच्या संदर्भात चर्चा झाली. पुन्हा दुपारी 4 वाजता बैठक घेणार आहोत आणि बैठकीनंतर राज्यपालांना आपला निर्णय कळवणार आहोत, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना दिली.
मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंनी मालाडमधील हॉटेल द रिट्रीटमध्ये जाऊन शिवसेना आमदारांची भेट घेतली. राज्यात आपलच सरकार बनणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार असल्याचा शब्द उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना दिल्याची माहिती मिळत आहे. तसेच आतापर्यंत पालखीचे भोई होतो, आता भोई होणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आपण अजूनही युती तोडली नसल्याचं म्हणत, युतीची दारं उघडे असल्याचंही त्यांनी सूचवल्याची माहिती समोर येत आहे.Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
महत्त्वाच्या बातम्या






















