तरुण कलाकारांसाठी आनंदाची बातमी! सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांसाठी सरकारची फेलोशिप, दरमहा मिळतात..
शास्त्रीय नृत्य, स्वदेशी कलाकृती आणि इतर पारंपरिक कलाप्रकारांसह विविध सांस्कृतिक क्षेत्रात खास कामगिरी करत इच्छिणाऱ्या तरुण कलाकारांना ही फेलोशिप देण्यात येते.
देशभरातील तरुण कलाकारांसाठी आनंदाची बातमी. सांस्कृतिक क्षेत्रात असणाऱ्या तरुण कलाकारांना पाठिंबा देण्यासाठी सरकारने फेलोशिप सुरु केली असून दोन वर्षांच्या कालावधीसाठी कलाकारांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. महाराष्ट्रातील २८ तरुण कलाकारांसाठी यंदा ही फेलोशिप प्रदान केली जाणार असल्याचे सांस्कृतिक मंत्रालयानं सांगितलंय.
शास्त्रीय नृत्य, स्वदेशी कलाकृती आणि इतर पारंपरिक कलाप्रकारांसह विविध सांस्कृतिक क्षेत्रात खास कामगिरी करत इच्छिणाऱ्या तरुण कलाकारांना ही फेलोशिप देण्यात येते.
काय आहे पात्रता?
- शिष्यवृत्तीचा कालावधी २ वर्षांचा असेल.
- विद्वानाचे मागील प्रशिक्षण आणि पार्श्वभूमी विचारात घेऊन प्रत्येक बाबतीत प्रशिक्षणाचे स्वरूप निश्चित केले जाईल. साधारणपणे, ते एखाद्या गुरू/मास्टर किंवा मान्यताप्राप्त संस्थेत आगाऊ प्रशिक्षणाच्या स्वरूपाचे असेल.
- विद्वानांना कठोर प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. अशा प्रशिक्षणामध्ये संबंधित विषय/क्षेत्राच्या सिद्धांताचे ज्ञान मिळविण्यासाठी आणि संबंधित विषयांचे कौतुक करण्यासाठी घालवलेल्या वेळेव्यतिरिक्त केवळ सरावासाठी दिवसातून किमान तीन तासांचा समावेश असेल.
- प्रत्येक विद्वानाला रु. 5000/- दरमहा दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रवास, पुस्तके, कला साहित्य किंवा इतर उपकरणे आणि शिकवणी किंवा प्रशिक्षण शुल्क, जर काही असेल तर त्याचा/तिचा राहण्याचा खर्च भागवण्यासाठी ही रक्कम दिली जाते.
- संबंधित कलावंताने आधी घेतलेले प्रशिक्षण आणि पाश्र्वभूमी लक्षात घेऊन त्याची निवड केली जाते. मान्यताप्राप्त संस्थेतील गुरुंकडे अधिक प्रगत प्रशिक्षणाची सुविधा असते. शिष्यवृत्तीच्या कालावधीत कलावंतास खडतर प्रशिक्षण घ्यावे लागेल. सैद्धांतिक ज्ञान प्राप्तीसाठी वेळ दिल्यानंतर या कलाकारास दररोज किमान तीन तास सराच करणे बंधनकारक आहे.
सांस्कृतिक मंत्रालयाने सांस्कृतिक संवर्धनासाठी शिष्यवृत्ती आणि फेलोशिप योजना या नावाने केंद्रीय क्षेत्र योजना राबवत असल्याचे सांगण्यात आले.
कोणाकोणाला ही फेलोशिप मिळू शकते?
भारतीय शास्त्रीय संगीत
भारतीय शास्त्रीय नृत्य/नृत्य संगीत
रंगमंच
व्हिज्युअल आर्ट्स
लोक, पारंपारिक आणि देशी कला
लाइट शास्त्रीय संगीत
निवडप्रक्रीया कशी असेल?
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना तज्ञांपुढे आपली कला सादर करावी लागेल किंवा मुलाखत द्यावी लागेल. मुलाखत किंवा कला सादरीकरणाची वेळ तारीख आणि ठिकाण उमेदवारांना ईमेलद्वारे कळवले जाते. उमेदवाराची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर केली जाते. निवड यादी संस्थेच्या संकेतस्थळावर घोषित केली जाते, निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष कळवलेही जाते.
हेही वाचा: