एक्स्प्लोर
Advertisement
भाजप सरकारचा पवारांना दणका, बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा दुष्काळी भागाला
डाव्या कालव्यात वळवलेले 11 टीएमसी पाणी दुष्काळी भागात आणण्यासाठी माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनी यासाठी ताकद पणाला लावली. त्यानंतर खुद्द शरद पवार आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
पंढरपूर : सत्तेत असताना कायद्यात बदल करुन बारामतीकडे वळवलेले दुष्काळी भागाचे नीरा देवधरचे पाणी पुन्हा दुष्काळी भागाला वळवण्यात आले आहे. भाजप सरकारने निर्णय घेत थेट शरद पवारांना मोठा दणका दिला आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते यांचा प्रयत्नांना मोठं यश आलं असून याच्या उपस्थितीत पाणी आज बारामतीचं पाणी सोडण्यात आलं. दुष्काळी भागातील स्थानिकांकडून फटाके फोडून आनंदोत्सवसुद्धा साजरा करण्यात आला.
माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजित निंबाळकर यांनी निवडून येताच सांगोला येथील दुष्काळी बैठकीत याबाबत आवाज उठवत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाण्याची मागणी केली होती. आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेत बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा उजव्या कालव्यातील दुष्काळी भागात वळवण्यात आले आहे. या दुष्काळी भागात सांगोला, माळशिरस, पंढरपूर फलटणला या भागांचा समावेश येतो.
Baramati Water | भाजप सरकारचा शरद पवारांना दणका, बारामतीचे पाणी पुन्हा दुष्काळी भागाला | ABP Majha
नीरा देवधरचे 1954 साली वाटप करताना पुणे बारामती पाणी घेत असलेल्या डाव्या कालव्यात 43 टक्के तर सांगोला, फलटण, माळशिरस आणि पंढरपूर पाणी घेत असलेल्या उजव्या कालव्याला 57 टक्के पाणी देण्याचा निर्णय झाला होता. पुढे 2009 मध्ये अजित पवार जलसंपदा मंत्री झाल्यावर त्यांनी करार बदलत दुष्काळी उजव्या कालव्याचे जवळपास 11 टीएमसी पाणी बारामतीकडे डाव्या कालव्यात वळवले होते.
आणखी वाचा : लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारचा पवारांना दणका, बारामतीचं पाणी रोखण्याचे आदेश
डाव्या कालव्यात वळवलेले 11 टीएमसी पाणी दुष्काळी भागात आणण्यासाठी माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनी यासाठी ताकद पणाला लावली. त्यानंतर खुद्द शरद पवार आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीतून मिळणारे पाणी पुन्हा जाऊ नये यासाठी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी गळफास आंदोलनाचा इशारा देत मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला होता.
आता पुन्हा एकदा 1954च्या कायद्यानुसार हे पाणीवाटप करण्याचा मोठा निर्णय भाजप सरकारने घेतला. बारामतीला वळवलेले दुष्काळी भागाच्या हक्काचे पाणी पुन्हा एकदा या भागाला मिळणार असल्याने या भागातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून त्यांची तहान भागणार आहे.
कसं होतं 1954चं पाणीवाटप
- डावा कालवा - बारामती व पुणे - 43 टक्के
- उजवा कालवा - सांगोला, माळशिरस, फलटण आणि पंढरपूर - 57 टक्के
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement