Gondia News : विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार
जैन धर्मातील दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अंत्यदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे जखमी आहे.
Gondia News गोंदिया : जैन धर्मातील दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज (Aacharya Vidhya Sagar Maharaj) यांच्या अंत्यदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा जवळील पानगाव येथे हा भीषण अपघात (Gondia News) झाला. पुजारीटोला धरणाच्या कालव्यामध्ये गाडी कोसळली (Accident) असून कालव्यामध्ये पाणी असल्याने यात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे भाविक जखमी झाले आहे. सध्या त्यांच्यावर सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अपघातात तिघे जागीच ठार
दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी वृद्धपकाळाने निधन झालं. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांच निधन झालं. त्यांच्या अंत्य दर्शनाला जात असताना हा अपघात झाला आहे. मध्यप्रदेश राज्यातील रिवा जिल्ह्यातून छत्तीसगडच्या डोंगरगड कडे हे भाविक काल, 17 फेब्रुवारीला रात्री निघाले होते. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील पानगाव येथे गाडी अनियंत्रित झाल्याने पुजारीटोला धरणाच्या कालव्यामध्ये त्यांची कार कोसळली. दरम्यान कालव्यामध्ये पाणी असल्याने पाण्यात बुडून या तिन्ही भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील तपास सुरू केला आहे. सध्या इतर जखमी तीन भाविकांवर सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
आचार्य विद्यासागर महाराजांचा जीवनप्रवास
आचार्य विद्यासागर महाराज याचं मूळ नाव विद्याधर. दीक्षेनंतर त्यांचं विद्यासागर मुनी असं नामकरण झालं. कर्नाटकच्या बेळगावमधील चीकोडच्या सदलागा या गावामध्ये विद्यासागर याचं नववीपर्यंत शिक्षण झालं. आचार्यविद्यासागर मुनींनी 1966 मध्ये जैन मुनी आचार्य देशभूषण महाराज यांच्याकडून ब्रह्मचर्य व्रत घेतलं होतं. 30 जून 1968 मध्ये आचार्य ज्ञानसागर महाराज यांनी वयाच्या 20 वर्षी मुनी दीक्षा दिली. 22 नोव्हेंबर 1972 रोजी वयाच्या अवघ्या 26 वर्षी त्यांना आचार्य पद देण्यात आलं.
पंतप्रधान मोदींनी घेतलं होतं दर्शन
जैन धर्मियांचे आचार्य विद्यासागर महाराज यांनी मुलींच्या शिक्षणासाठी संस्था आश्रम उभ्या केल्या. देशभरात हजारो गो शाळा स्थापन केल्या. विद्यासागर यांना आठ भाषा अवगत होत्या. त्यांनी मुख्य ग्रंथ मूकमाटी महाकाव्य ग्रंथ लिखाण केलं. हा संस्कृतमधील लिखाणांनंतर 8 भाषेत अनुवादित करण्यात आला. विद्यासागर महाराज यांनी देशभरात पद यात्रा काढून समाजाचा प्रसार, प्रचार करत त्यांनी हजारो मुनींना दीक्षा दिली. यामध्ये तरुण उच्चशिक्षित देशविदेशातील तरुणांना मार्गदर्शन केलं. जैन धर्मियांच्या दिगंबर पंथीयामध्ये सर्वोच आचार्य पद मिळालं. देशभरातील अनेक राजकीय व्यक्ती आचार्य विद्यासागर महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या भेटी घ्यायचे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सुमित्रा महाजन, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल रमेश बैस यांनी ही विद्यासागर महाराज यांना भेटून आशिर्वाद घेतले होते.
इतर महत्वाच्या बातम्या