एक्स्प्लोर
ऐन लग्नाच्या तोंडावर तरुणीचा गळफास, हुंडा मागितल्याचा आरोप
गोंदिया : गोंदियात लग्नाच्या तोंडावर एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आमगाव तालुक्यातील रिशामा गावात लग्नाच्या अवघ्या पाच दिवस आधी तरुणीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.
सासरच्या मंडळीने हुंडा मागितल्यामुळे संध्या बारई या तरुणीने आत्महत्या केली आहे. सुसाईड नोटमध्ये त्याबाबतचा उल्लेख तिने केला आहे. 13 नोव्हेंबरला नागपूरच्या प्रदीप भोंगेकरशी ती विवाहबद्ध होणार होती.
मुलाकडून सातत्याने पैशांची मागणी होत होती. त्याला कंटाळून तरुणीने टोकाचा निर्णय घेतला. आमगाव पोलिसात आरोपी मुलाविरुद्ध मृत मुलीच्या पालकांनी गुन्हा दाखल केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement