Gondia election result 2021 : गोंदियात भाजपची सत्ता, पाहा कुणाला मिळाल्या किती जागा?
Gondia election result 2021 : राष्ट्रवादी कॉग्रेस आणि भारतीय काँग्रेसला गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.
- हरिष मोटघरे
Gondia election result 2021 : गोंदिया जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणुकीचे परिणाम जाहीर झाले आहेत. गोंदियामध्ये जिल्हा परिषदमध्ये भाजपला एकूण 53 जागांपैकी 26 जागांवर विजय मिळविण्यात यश आले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस आणि भारतीय काँग्रेसला गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.
गोंदियात जिल्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 53 जागा असून भाजपाला या ठिकाणी 26 जगाला तर काँग्रेसला 14 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागांवर समाधान मानावे लागले. तर अपक्ष उमेदवार 5 जागांवर आले आहेत. भाजप एका अपक्ष उमेदवाराला सोबत घेत सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोंदियात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि काँग्रेस नेते नाना पाटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण हवा तसा विजय दोन्ही पक्षाला मिळविता आला नाही.
गोंदिया जिल्यात आज देवरी ,सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या तीन नगर पंचायतीसाठी मतदान झाले. देवरी नगर पंचायतीमध्ये भाजपाला 11 जागा आणि काँग्रेसला 4 जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागेवर समाधान मानवे लागले. मोरगाव अर्जुनी नगर पंचायत मध्ये भाजपाला 7 तर राष्ट्रवादी काँग्रेस 4 जागा मिळाल्या. काँग्रेसला चार आणि अपक्ष दोन जागा मिळाल्या आहेत. सडक अर्जुनी नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 7 जागा तर बाहुबली प्यानलला 3 जागा तर अपक्ष 3 जागा काँग्रेस 2 जागा मिळाल्या. शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी 1 जागेवर समाधान मानवे लागले.
गोंदिया पंचायत समिती निकाल कसा लागला?
गोंदिया पंचायत समिती 28 जागापैकी
भाजप :- 10 ,चाबी संघटन 10 जागा राष्ट्रवादी 5 जागा अपक्ष 3
तिरोडा पंचायत समिती 14 जागापैकी
भाजप :- 09 जागा ,राष्ट्रवादी 3 जागा काँग्रेस 1 तर अपक्ष 1
गोरेगाव पंचायत समिती 12 जागापैकी
भाजप :- 10 जागा ,काँग्रेस 2
देवरी पंचायत समिती 10 जागापैकी
भाजप :-6 जागा ,काँग्रेस 4
आमगाव पंचायत समिती 10 पैकी
भाजप 5 ,काँग्रेस 4 ,राष्ट्रवादी काँग्रेस 1
सालेकसा पंचायत समिती 8 जागा पैकी
काँग्रेस 6, भाजप 2
मोरगाव अर्जुनी 14 जागा पैकी
भाजप 6, काँग्रेस 4 ,राष्ट्रवादी 2 ,अपक्ष 2
सडक अर्जुनी 10 जागा पैकी
भाजप 7 ,राष्ट्रवादी 2 कॉग्रेश 1