एक्स्प्लोर

Gondia-Bhandra Election : विधानपरिषदेच मैदान मारलं, आता भंडारा-गोंदीया जिल्ह्याच्या विधानसभेची धुरा परिणय फुकेंच्या खांद्यावर? 

नागपूर विभानतळावर भाजप पदाधिकाऱ्यांनी लावलेले परिणय फुके यांचे होर्डिंग आता चर्चेचा विषय ठरला आहे. यात परिणय फुके यांचा उल्लेख भंडारा गोंदिया जिल्ह्याचे जननायक असा करण्यात आला आहे.

Gondia-Bhandra Election 2024 : नुकतीच पार पडलेली विधानपरिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election Result) चांगलीच चुरशीची झाली. आपले सर्व उमेदवार विजयी व्हावेत यासाठी महायुतीने आपली ताकत पणाला लावली होती. प्रत्यक्ष निवडणुकीतही त्याचा सकारात्मक परिणाम दिला. महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी झाले. यात भाजपचे नेते परिणय फुके (Parinay Fuke) यांचा देखील समावेश आहे. फुके हे विधपरिषदेचे आमदार झाले असले तरी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले (Nana Patole) यांना शिंगावर घेण्यासाठी ते भंडारा- गोंदिया जिल्ह्यात (Bhandara Gondia  Election) सक्रिय राहणार असल्याचे संकेत मिळत आहे.

याला निमित्त ठरले आहे ते नागपूर विभानतळावर भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी परिणय फुके यांचे लावलेले होर्डिंग. यात परिणय फुके यांचा उल्लेख भंडारा गोंदिया जिल्ह्याचे जननायक असा केला आहे. त्यामुळे परिणय फुके आमदार झाले असले तरी पुढील काळातील भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची धुरा फुके यांच्या खांद्यावर राहील, असे चिन्ह दिसत आहे. या होर्डिंगची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. 

विधानसभेची धुरा परिणय फुकेंच्या खांद्यावर?

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात (Bhandara Gondia Lok Sabha Election) काँग्रेसचा नवा चेहरा असलेले डॉ. प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांनी सलग दुसऱ्यांदा महायुतीचे उमेदवार असलेले सुनील मेंढे (Sunil Mendhe) यांचा पराभव केलाय.  या मतदारसंघातून सुरवातीला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यांच्या नावाची चर्चा होती. तर दुसरीकडे त्यांना शह देण्यासाठी भाजप नेते परिणय फुके यांनी कंबर कसली होती. मात्र स्वत: नाना  पटोले यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याने परिणय फुके यांनी देखील आपली माघार घोषित केली. त्यानंतर भाजप पक्ष नेतृत्त्वाने विधानपरिषदेच्या निवडणुकीत परिणय फुके यांना संधी दिली आणि त्यात त्यांचा विजयी झाला.

नागपूर विभानतळावर लागलेल्या होर्डिंगची चर्चा 

असे असले तरी आता साऱ्यांना वेध लागले असलेल्या विधानसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे नेतृत्त्व पुन्हा  परिणय फुके यांच्या कडे येण्याचे संकेत आहे. त्याला कारण ठरले आहे नागपूर विभानतळावर भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी परिणय फुके यांचे लावलेले होर्डिंग. यात परिणय फुके यांचा उल्लेख भंडारा गोंदिया जिल्ह्याचे जननायक असा केला आहे. भाजपच्या उद्योग आघाडीचे अध्यक्ष असलेल्या आकाश अग्रवाल यांचा नेतृत्वात हे होर्डिंग लावण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता आता भंडारा-गोंदीया जिल्ह्याची विधानसभेची धुरा परिणय फुकेंच्या खांद्यावर येते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...
Raje Mudhoji Bhosle : मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा NCERTच्या इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर भोसले घराण्याचा आरोप
मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा NCERT नं एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर मुधोजीराजेंचा आरोप
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार
एटीएसच्या कारवाईत धक्कादायक बाबी समोर!  तलवारींसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त 
एटीएसच्या कारवाईत धक्कादायक बाबी समोर!  तलवारींसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त 

व्हिडीओ

Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 WC 2026 Ind vs Ned Abhishek Sharma: आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
Shiv Jayanti 2026 : आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा..., देशभरात शिवजयंतीचा उत्साह, किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांची मांदियाळी, आकर्षक सजावट, Photos
आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा..., देशभरात शिवजयंतीचा उत्साह, किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांची मांदियाळी, आकर्षक सजावट, Photos
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात मशाल महोत्सव, हजारो मावळ्यांच्या सहभागानं अजिंक्यतारा उजळला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अजिंक्यताऱ्यावर मशाल महोत्सव, हजारो मावळ्यांची हजेरी
Raj Thackeray: एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
Vijay Mallya : विजय मल्ल्यानं इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं, भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही म्हणाला, कोर्टात नवा कांगावा
भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही, विजय मल्ल्याचा नवा कांगावा, इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
Embed widget