(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bail Pola 2022 : बैलपोळा सणाला सुट्टी द्या, हा दिवस 'बळीराजा दिन' म्हणून घोषित करा, प्रतिभा धानोरकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बैलपोळा सणाला सरकारनं शासकीय सुट्टी जाहीर करावी. तसेच हा दिवस 'बळीराजा दिन' म्हणून घोषित करा अशी मागणी काँग्रेसच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर (Mla Pratibha Dhanorkar) यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Bail Pola 2022 : आज बैलपोळ्याचा (Bail Pola) सण आहे. मागील दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळं (corona crisis) हा सण उत्साहात साजरा करता आला नव्हता. यंदा मात्र, कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळं हा सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. दरम्यान, बैलपोळा सणाला सरकारनं शासकीय सुट्टी जाहीर करावी. तसेच हा दिवस 'बळीराजा दिन' म्हणून घोषित करा अशी मागणी काँग्रेसच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर (Congress Mla Pratibha Dhanorkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टाबाबत आपण नेहमीच चर्चा करतो. मात्र, शेतकऱ्यांसोबत आणखीण एक जण आहे, जो शेतात खूप राबतो. तो म्हणजे बैल. आपल्या मालकाला त्याच्या कष्टाचे चीज मिळेपर्यंत तो शेतात राबतो. याच कष्टकरी बैलाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातो. आज बैलाची देव समजून पूजा केली जाते. त्यामुळं बैलपोळा या सणाला महाराष्ट्र शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी. तसेच हा दिवस 'बळीराजा दिन' म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करण्यात यावा अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. पोळ्याच्या दिवशी फक्त बैलांचीच नाही तर शेतीसाठी लागणाऱ्या नांगर, विळी, कोयता, खोर इत्यादी साधनांची देखील पूजन केले जाते. बैलाचे शेतकऱ्यांवरती अनंत उपकार असतात. ते उपकार शेतकरी फेडू शकत नाही. म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण अगदी आत्मियतेने साजरा केला जात असल्याचे धानोरकर यांनी म्हटल आहे.
बळीराजाचा उचित सन्मान करा
महाराष्ट्र राज्य हे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे राज्य म्हणून ओळखलं जातं. राज्यात शेती हा प्रमुख व्यवसाय असून महाराष्ट्रात राज्यात सर्वत्र पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. अलिकडेच आपण गोकुळाष्टमी निमित्त दहिहंडीची शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात उत्साहात साजऱ्या होणाऱ्या बैलपोळा या सणाला देखील महाराष्ट्र शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी. तसेच हा दिवस बळीराजा दिन म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करण्यात यावा. जेणेकरुन या निमित्ताने अन्नदाता असणाऱ्या बळीराजाचा उचित सन्मान होईल असेही प्रतिभा धानोरकर यांनी म्हटलं आहे.
बैलपोळा सणाचे महत्त्व
हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांची खांदेमळणी केली जाते. पोळ्यादिवशी बैलांना नदीवर नेऊन अंघोळ घालतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल घातली जाते. तसेच शिंगांना रंग रंगोटी केली जाते. शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घातले जाते. त्याला खायला गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.
महत्त्वाच्या बातम्या: