एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कीटकनाशकाने दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत द्या: हायकोर्ट
कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 4 लाखाची मदत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत.
नागपूर : कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 4 लाखाची मदत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत.
कीटकनाशक फवारणीत 51 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी 21 शेतकऱ्यांच्य़ा कुटुंबाला राज्य सरकारनं 2 लाखाची मदत दिली. मात्र ही मदत कमी असून त्यांना 4 लाखाची मदत मिळावी असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. जम्मू आनंद यांनी याप्रकरणी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याच सुनावणीदरम्यान कोर्टाने राज्य सरकारला हे आदेश दिले आहेत.
कीटकनाशक फवारणी मृत्यूप्रकरणी स्थानिक प्रशासन दोषी : एसआयटी
दरम्यान, कीटकनाशकांची फवारणी करताना फक्त विदर्भात अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला होता. विदर्भ आणि मराठवाड्यात कपाशी आणि सोयाबीनवर पावसाचा मोठा खंड पडल्याने किडींचा मोठ्या प्रमाणात पादुर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी जहाल कीटकनाशकांची पिकांवर फवारणी केली होती. मात्र, फवारणी करताना योग्य ती काळजी घेतली न गेल्याने अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मृत्यूला कोण दोषी आहे, याची चौकशी करण्यासाठी एसआयटीची नियुक्ती केली होती. एसआयटीने स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी दोषी ठरवलं होतं. विषबाधा होण्यामागची कारणं काय? अतिविषारी जहाल कीटकनाशकांचा वापर, परवाना नसलेली कीटकनाशकांची कृषी केंद्र चालकांकडून होणारी विक्री, शेतकरी आणि शेतमजूर यांच्याकडून योग्य दक्षता न घेता केली गेलेली फवारणी, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीसाठी मार्गदर्शनाचा अभाव ही विषबाधा होण्यामागची प्रमुख कारणं असल्याचं समोर आलं आहे. चिनी बनावटीचा पंप बाजारात 3 हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत मिळतो. पेट्रोलवर चालणारा हा पंप आहे. त्यामुळे कमी वेळात जास्त फवारणी होते. त्यामुळे अलीकडच्या काळात या पंपांचा वापर वाढला आहे.संबंधित बातम्या :
चिनी बनावटीचे फवारणी पंप वापरल्याने शेतकऱ्यांना विषबाधा?फवारणी करताना विषबाधा, मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत!
‘फवारणी करताना विदर्भात 18 जणांचा मृत्यू, तर 546 शेतकरी व्हेंटिलेटरवर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement