एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फी भरण्यासाठी पैसे नसल्याने सोलापुरात विद्यार्थिनीची आत्महत्या
मुदतीत फीस भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे रुपालीने रात्री उशिरा आपल्या राहत्या घरी किटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.
सोलापूर : शिक्षणासाठी फी भरायला पैसे नसल्याने एक विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील देगाव येथे ही दुर्दैवी घटना आहे. रुपाली रामकृष्ण पवार असं या मुलीचं नाव आहे. रुपालीचा पंजाबच्या जालिंदर येथील लव्हली प्रोफेशनल अकॅडमीला बीटेकसाठी प्रवेश निश्चित झाला होता.
प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटी पात्रता परीक्षेत रुपालीने 89 टक्के मिळवले होते. प्रवेशासाठी 1 लाख 10 हजार रुपये फी भरणे आवश्यक होते. 10 हजार रुपये अॅडव्हान्स रक्कम भरत रुपालीने आपला प्रवेश निश्चित केला होता. उर्वरित रक्कम भरण्यासाठी 20 जुलैची मुदत होती. मात्र मुदतीत फीस भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे रुपालीने रात्री उशिरा आपल्या राहत्या घरी किटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.
मुदतीत फीस भरणे शक्य न झाल्यामुळे रुपालीने जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रुपालीचे वडील हे गावातील शेतात मजुरीचे काम करतात. मुलीच्या शिक्षणासाठी शेती देखील विकायला काढली होती. मात्र शेतीला कवडीमोल किमतीने खरेदीदार आल्याने शेतीची विक्री झाली नाही. शिक्षणामध्ये हुशार असून देखील आपल्या परिवाराची होरपळ सहन न झाल्याने तसेच पुढील शिक्षण होणार या विवंचनेतून तिनं आत्महत्या करीत आपलं जीवन संपवलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement