एक्स्प्लोर
नागपुरात 22 वर्षीय तरुणीची चाकूने वार करुन हत्या
रत्नमाला रांगणकर वेस्टर्न कोल फील्ड या सरकारी कोळसा कंपनीत कार्यरत होती. तिच्या हत्येचं कारण अस्पष्ट असले, तरी आरोपी बागडे हा रत्नामालाच्या ओळखीतला होता, असे कळते आहे.
नागपूर : 22 वर्षीय तरुणीवर चाकूने वार करुन, तिची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. पारशिवणी तालुक्यातील शिंगोरी येथील बस स्टॉपजवळ ही खळबळजनक घटना घडली. रत्नमाला राजकुमार रांगणकर असे मृत तरुणीचे नाव आहे.
आज सकाळी 9.30 च्या सुमारास रत्नमाला तिच्या आईसोबत स्कूटरवरुन जात असताना, बाईकवरुन आलेल्या आरोपीने कट मारुन तिला खाली पाडले. त्यानंतर आरोपीने रत्नमालावर चाकूचे पाच ते सहा वार केले. यात रत्नमाला गंभीररित्या जखमी झाली.
या घटनेनंतर रत्नमालाला तातडीने उपचारासाठी कामठी येतील आशा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे रत्नमालाचा मृत्यू झाला.
मंगल उर्फ साजन बागडे असे आरोपीचे नाव असून, तो 25 वर्षीय आहे.
रत्नमाला रांगणकर वेस्टर्न कोल फिल्ड या सरकारी कोळसा कंपनीत कार्यरत होती. तिच्या हत्येचं कारण अस्पष्ट असले, तरी आरोपी मंगल बागडे हा रत्नामालाच्या ओळखीतला होता.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement