उद्धव ठाकरेंनी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलं, डेड बॉडीमध्ये किती पैसे खाल्ले? महाजनांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बडबड करण्यापेक्षा लोकांमध्ये जावं. लोकांमध्ये जाऊन बोलावं, कार्यकर्त्यांना कामाला लावावं, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
Girish Mahajan on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बडबड करण्यापेक्षा लोकांमध्ये जावं. लोकांमध्ये जाऊन बोलावं, कार्यकर्त्यांना कामाला लावावं, असं काहीतरी उद्धव ठाकरे यांनी केलं पाहिजे असे म्हणत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी टीका केली. याला त्याला बोगस म्हणण्यापेक्षा तुमचं काय? तुम्हाला लोकांनी अडीच वर्ष दिले होते. खरंतर ते लोकांनी तुम्हाला दिले नाही तुम्ही दगाबाजी करुन ते घेतल्याचे महाजान महाजन म्हणाले. अडीच वर्षांमध्ये तुम्ही काय दिवे लावले तुम्ही घराच्या खाली उतरले नाही. डेड बॉडीमध्ये तुम्ही किती पैसे खाल्ले किती लोक त्यामध्ये जेलमध्ये आहेत. कोरोना काळात मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं? मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केल्याची टीका महाजन यांनी केली.
मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सर्वात पहिले देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. असं असताना कोणीही काहीही बोलावं, आपण कोणाबद्दल बोलतोय याचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. इतक्या वर्षापासून आपल्या आरक्षणाची मागणी असताना कुठल्याही सरकारने आपल्या पदरात काही टाकलं नाही. ते फक्त देवेंद्र फडणवीस होते ज्यांनी आरक्षणाबाबत वाचा फोडली आणि आमच्या समाजाच्या पदरात काहीतरी दिल्याचे महाजन म्हणाले. दुर्दैवाने कोर्टामध्ये ते टिकलं नाही हा भाग वेगळा आहे. दुर्दैवाने आमचं सरकार बदललं त्यामुळे ते कोर्टामध्ये तत्कालीन काँग्रेसचे सरकार टिकवू शकलं नाही त्यात आमचा दोष नसल्याचे महाजन म्हणाले.
जिभेवर संयम ठेवला पाहिजे, गिरीश महाजन यांचा मनोज जरांगेंना सल्ला
पहिल्यांदा कोणीतरी काहीतरी दिलं हे सर्वांना मान्य आहे. असं असताना फडणवीस हे खुणशी आहेत असं म्हणण्याला काही अर्थ नाही, या वक्तव्याला कोणीही साथ देणार नाही असे महाजन म्हणाले. जरांगे पाटील काय बोलत आहेत हे आपण अनेक दिवसापासून ऐकत आहोत. जरांगे पाटील कुठल्या थराला जाऊन बोलत आहेत. आपल्या मागण्या आहेत त्या असू द्या रास्त मार्गाने मागितल्या पाहिजे. कोणाविषयी काही बोलावं मागच्या वेळी त्यांचा बोलण्याचा स्तर इतका खाली गेला होता की लोकांनाही कंटाळा आला होता असे महाजन म्हणाले. म्हणून मला वाटतं रास्त मार्गाने आपण मागण्या मागू शकता शासनाकडे ठेवू शकता. मात्र हे करत असताना आपल्या जिभेवर संयम ठेवला पाहिजे असे म्हणत गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांना सल्ला दिला आहे.
नाचता येईना अंगण वाकड, गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना टोला
नाचता येईना अंगण वाकड असे म्हणत गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांनी मत चोरीवरुन केलेल्या वक्तव्यावर टोला लगावला. बेस्ट निवडणुकीमध्ये ठप्पे मारले गेले. तुम्ही जो मराठी माणूस मराठी माणूस सांगावा करत आहात त्याला कोणी मतदान केलं? शून्य सुद्धा फोडता आला नाही, तुम्हाला कोणी मतदान सुद्धा केलं नाही. कधी मतपेट्या खराब झाल्या, कधी बॅलेट पेपर तर कधी मतदार याद्या खराब झाल्या असं तुम्ही म्हणायचे. लोक तुम्हाला स्वीकारत नाही आणि मग तुम्ही प्रत्येक वेळी नवीन नवीन कारण शोधायचे असे महाजन म्हणाले.
राहुल गांधींना आता काही काम दिसत नाही
जनता जनार्दन सर्वात मोठा आहे तुम्ही निवडणुकीला समोर जा आता महापालिकेच्या निवडणुका आहेत मग कशाला रडत बसताय. राहुल गांधींना आता काही काम दिसत नाही लोकसभेपर्यंत सर्व गोड वाटलं. लोकसभेच्या वेळी तुम्हाला मोठं मताधिक्य महाराष्ट्रात मिळालं तेव्हा आम्ही रडलो का? असा सवाल महाजन यांनी केला. तुमचं सरकार त्यावेळी होतं त्यावेळी मतपेट्या मतदान याद्या खराब केल्या असे आम्ही रडलो नाही. आम्ही पुन्हा तयारीला लागलो लोकांमध्ये गेलो जागृती केली म्हणून ही तुमची परिस्थिती झाल्याचे महाजन म्हणाले. आधी म्हणतात मशीन खराब आहे आता म्हणतात याद्या खराब आहेत. लोकसभेच्या याद्याच विधानसभेमध्ये होत्या. हे नाटक बंद करा लोक तुम्हाला आता स्वीकारायला तयार नाहीत असे महाजन म्हणाले.
पालकमंत्री पदाची मागणी करण्याचा अधिकार सर्वांना
पालकमंत्री पदाची मागणी करण्याचा अधिकार हा सर्वांचा आहे. जो निर्णय पक्षश्रेष्ठींकडून होईल तो आम्हाला मान्य राहील अस महाजन म्हणाले. छगन भुजबळ यांनी कुंभमेळ्याची बैठक घेतली आहे. मात्र कुंभमेळा हा मोठा इव्हेंट आहे. त्यामुळं त्यांच्या बैठकीतून काही सूचना आल्यात व त्यांचा अनुभव दांडगा असल्यामुळं त्यातून फायदा होणार आहे असे महाजन म्हणाले. छगन भुजबळ यांनी बैठका घेऊ नये असं आम्ही म्हणत नाही. पालकमंत्री पदाच्या माझ्या दाव्याचा प्रश्न नाही पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील व मुख्यमंत्री तो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असला पाहिजे असे महाजन म्हणाले. मागच्या अडीच वर्षाच्या काळात दादा भुसे होते असे महाजन म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:























