एक्स्प्लोर

Adani : घोटाळेबाज उद्योगपती अदानींची अवस्था ‘सहारा’च्या सुब्रत रॉयसारखी होईल; नाना पटोलेंची टीका

Adani : सामान्य जनतेचे हजारो कोटी रूपये धोक्यात घालण्याचे पाप पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच (PM Modi) असून घोटाळेबाज उद्योगपती अदानींची (Adani) अवस्था ‘सहारा’च्या सुब्रत रॉयसारखी होईल अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

Adani : अदानी समूहाबाबत अमेरिकन रिसर्च फर्मने केलेल्या दाव्यानंतर त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजार (Share Market) आणि राजकीय क्षेत्रातही उमटू लागले आहेत. अदानींची (Adani) अवस्था ‘सहारा’च्या (Sahara) सुब्रत रॉयसारखी (Subrat Roy) होईल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. अदानींच्या व्यवहाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीच्या (SIT) माध्यमातून करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे घनिष्ठ संबंध सर्व जगाला माहीत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, एलआयसीसह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील सामान्य जनतेचा पैसा मोदींनी आपल्या उद्योगपती मित्राच्या विविध कंपन्यांमध्ये कोणताही विचार न करता गुंतवला आहे. अदानी कंपनीवर केलेल्या मेहरबानीमुळे कोट्यवधी रुपये बुडण्याची भीती निर्माण झाली असून या गैरव्यवहाराची संपूर्ण चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

केंद्रात सत्तेवर येण्याआधीपासून उद्योपती गौतम अदानी व नरेंद्र मोदी यांचे संबंध जगजाहीर आहेत असे पटोले यांनी म्हटले. केंद्रात सत्तेत आल्यानंतर या संबंधामुळे मोदी सरकारने अदानींच्या कंपन्यांवर विशेष मर्जी दाखवत स्टेट बँक इंडियाकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले. देशातील सर्वात मोठी व सामान्य गुंतवणुकदारांची विमा कंपनी LIC मधील 74 हजार कोटी रुपये अदानीच्या कंपनीत गुंतवले. अदानी हे जगातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत दुसऱ्या नंबरवर केवळ मोदी सरकारच्या आशिर्वादामुळेच पोहचले असल्याचा आरोप पटोले यांनी केला.  फायद्यातील सरकारी कंपन्याही मोदी सरकारने अदानीच्या घशातच घातल्या असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

अदानी कंपनीत मोठे गौडबंगाल आहे हे उघड होताच या कंपन्यातील शेअर कोसळले. एसबीआय, एलआयसीसह सरकारी कंपन्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. अदानीचा फुगा आज फुटला आहे. सहारा कंपनीच्या सुब्रत रॉयचा सुद्धा असाच बोलबाला होता पण सहाराचा फुगा फुटला आणि सुब्रत रॉयला जेलची हवा खावी लागली. करोडो लोकांचे पैसेही बुडाले. अदानीची अवस्थाही सहाराच्या सुब्रत रॉय सारखीच होईल, असा दावा त्यांनी केला.

देशातील अत्यंत महत्वाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून मुंबई विमानतळाची ओळख आहे. मुंबईचा हा विमानतळ अदानीच्या घशात घालण्यासाठी मोदी सरकारने सरकारी तपास यंत्रणांचा कसा गैरवापर केला हे सर्वांना माहित असल्याचा दावा त्यांनी केला. 

मुंबईतील वीज वितरणही अदानीला देण्याचा घाट राज्यातील फडणवीस सरकारने घेतला होता पण महावितरणचे कर्मचारी व जनतेच्या विरोधामुळे तूर्तास वीज वितरण अदानीकडे जाऊ शकले नाही. दुबईच्या कंपनीने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जास्त पैशांची बोली लावून करार केला असतानाही तो करार रद्द करुन मोदी सरकारच्या हट्टापायी धारावीचा प्रकल्प अदानी कंपनीला कमी पैशात देण्यात आला. अदानीचा गैरकारभार पाहता धारावीतील लाखो गरिब लोकांची घरे व छोट्या उद्योगांसमोर संकट उभे राहिले आहे. अदानीचा गैरकारभार आता उघड झाला असून सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानीकडून काढून घ्यावा, अशी मागणीदेखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अब्दुल सत्तारांनी केलेल्या भानगडीमुळं मुत्रीपद गेलं, सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी स्थिती, दानवेंचा हल्लाबोल
अब्दुल सत्तारांनी केलेल्या भानगडीमुळं मुत्रीपद गेलं, सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी स्थिती, दानवेंचा हल्लाबोल
सीबीआय संचालक, मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी सरन्यायाधीश कशाला पाहिजेत? उपराष्ट्रपतींची विचारणा
सीबीआय संचालक, मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी सरन्यायाधीश कशाला पाहिजेत? उपराष्ट्रपतींची विचारणा
Dhule Crime : चालत्या बसमध्ये दोन महिलांचा चोरीचा प्लॅन, युवकाला कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
चालत्या बसमध्ये दोन महिलांचा चोरीचा प्लॅन, युवकाला कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
Arvind Kejriwal : दिल्लीत भाजप सरकार स्थापन होण्यापूर्वीच माजी अरविंद केजरीवालांवर आणखी एक 'कुऱ्हाड' कोसळली; थेट आदेश सुद्धा निघाला!
दिल्लीत भाजप सरकार स्थापन होण्यापूर्वीच माजी अरविंद केजरीवालांवर आणखी एक 'कुऱ्हाड' कोसळली; थेट आदेश सुद्धा निघाला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : सुरेश धस, मुंडे आणि कराड एकच! देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला..ABP Majha Marathi News Headlines11 AM TOP Headlines 11AM 15 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 15 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सSuresh Dhas Meets Dhananjay Munde : सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात समेट कुणी घडवून आणला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अब्दुल सत्तारांनी केलेल्या भानगडीमुळं मुत्रीपद गेलं, सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी स्थिती, दानवेंचा हल्लाबोल
अब्दुल सत्तारांनी केलेल्या भानगडीमुळं मुत्रीपद गेलं, सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी स्थिती, दानवेंचा हल्लाबोल
सीबीआय संचालक, मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी सरन्यायाधीश कशाला पाहिजेत? उपराष्ट्रपतींची विचारणा
सीबीआय संचालक, मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी सरन्यायाधीश कशाला पाहिजेत? उपराष्ट्रपतींची विचारणा
Dhule Crime : चालत्या बसमध्ये दोन महिलांचा चोरीचा प्लॅन, युवकाला कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
चालत्या बसमध्ये दोन महिलांचा चोरीचा प्लॅन, युवकाला कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
Arvind Kejriwal : दिल्लीत भाजप सरकार स्थापन होण्यापूर्वीच माजी अरविंद केजरीवालांवर आणखी एक 'कुऱ्हाड' कोसळली; थेट आदेश सुद्धा निघाला!
दिल्लीत भाजप सरकार स्थापन होण्यापूर्वीच माजी अरविंद केजरीवालांवर आणखी एक 'कुऱ्हाड' कोसळली; थेट आदेश सुद्धा निघाला!
Maharashtra Politics : एकत्र निवडणूक लढायची नसेल असेल तर...; भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू होताच शिवसेना नेत्याचं मोठं विधान
एकत्र निवडणूक लढायची नसेल असेल तर...; भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू होताच शिवसेना नेत्याचं मोठं विधान
महाकुंभसाठी आलेल्या भाविकांची बोलेरोची बसला भीषण धडक; 10 जणांचा अंत, 19 जखमी, मृतदेह काढण्यासाठी अडीच तास लागले
महाकुंभसाठी आलेल्या भाविकांची बोलेरोची बसला भीषण धडक; 10 जणांचा अंत, 19 जखमी, मृतदेह काढण्यासाठी अडीच तास लागले
Sanjay Raut : वाल्मिक कराड, सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकच, देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडलाय; गुप्त भेट समोर येताच संजय राऊतांचा हल्लाबोल
वाल्मिक कराड, सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकच, देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडलाय; गुप्त भेट समोर येताच संजय राऊतांचा हल्लाबोल
आया बहिणींचा उद्धार करत, हातपाय तोडून टाकतो म्हणत कोल्हापुरात सत्ताधारी 'भाऊ'कडून खंडणी उकळल्याचा प्रकार, प्रदर्शन मंडपही अचानक कोसळला
आया बहिणींचा उद्धार करत, हातपाय तोडून टाकतो म्हणत कोल्हापुरात सत्ताधारी 'भाऊ'कडून खंडणी उकळल्याचा प्रकार, प्रदर्शन मंडपही अचानक कोसळला
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.