अब्दुल सत्तारांनी केलेल्या भानगडीमुळं मंत्रीपद गेलं, सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी स्थिती, दानवेंचा हल्लाबोल
आजही सिल्लोडमध्ये (Sillod) पाकिस्तानसारखी (Pakistan) परिस्थिती आहे असं वक्तव्य भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलं.
Raosaheb Danve on Abdul Sattar : आजही सिल्लोडमध्ये (Sillod) पाकिस्तानसारखी (Pakistan) परिस्थिती आहे असं वक्तव्य भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलं. महापुरुषाच्या नावाने सार्वजनिक ठिकाणची जागा बळकावण्याचे काम सुरु असल्याचे दानवे म्हणाले. सिल्लोडमध्ये जिल्हा परिषदेची चार पाच एकरची जागा महापालिकेत घेतल्याचे दानवे म्हणाले. अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) मंत्रीपदाच्या काळामध्ये ज्या भानगडी केल्या त्यामुळे त्यांचे मंत्रीपद गेल्याचा हल्लाबोल दानवेंनी केला.
मी राज्यसभेवर आणि विधानपरिषदेवर जाणार नाही
मी राज्यसभेवर आणि विधानपरिषदेवर जाणार नाही. मला पक्षाने खूप काही दिलं आहे. माझी दोन मुलं आमदार आहेत. जर पक्षाने संधी दिली तर मी 2029 ची लोकसभेची निवडणूक लढेल असं वक्तव्य भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं.
सिल्लोडमध्ये सगळेच अब्दुल सत्तार यांच्या विचारधारेच्या विरोधात
अब्दुल सत्तार या व्यक्ती विरोधात मी नाही. मात्र, त्यांची जी वागण्याची पद्धत आहे, त्यामुळं सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील लोक नाराज आहेत असं दानवे म्हणाले. एका विशिष्ट विचारधारेच्या व्यक्तींना शासनाच्या सर्व योजनाच लाभ दिला जात आहेत. इतर लोकांना फायदा न मिळू देणे ही त्यांची विचारधारा आहे. मी देखील त्यांचा विरोध करतो. सगळेच अब्दुल सत्तार यांच्या विचारधारेच्या विरोधात आहे असं दानवे म्हणाले. मागच्या विधानसभा निवडणुकीत पेट्रोल आणि डिझेल हे भोकरदनहून भरले जात होतं, हे सत्य आहे. सिल्लोडमध्ये फक्त गोल टोपी वाल्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं जात होतं. त्यामुळं लांब टोपीवाले हे भोकरदनला येऊन पेट्रोल भरत होते असंही दानवे म्हणाले. सिल्लोडच्या प्रत्येक चौकाचे नाव काय आहे ते पहा ना? सुभाष चंद्र बोस यांचं नाव, महात्मा गांधींचे नाव, शामाप्रसाद मुखर्जींचे नाव नाहीत. नावावरुन तर त्या गावाची रचना कळते ना असेही दानवे म्हणाले. खायचं इकडचं आणि गायचं दुसऱ्याचं असंही ते म्हणाले.
आम्ही एकत्र बसतो हे संजय राऊतांचे दुःख
संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार काय संजय राऊतच्या खुटाची बांधील आहेत का? असा सवाल करत दानवेंनी रऊतांवर टीका केली. राजकीय पक्षांनी एकत्र बसून नचे का? आम्ही एकत्र बसतो हे संजय राऊतांचे दुःख आहे असे दानवे म्हणाले. आमचा पक्ष म्हणजे परिवार आणि यांचा पक्ष परिवाराचा पक्ष आहे.
महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेत बाप लेक दोघेच राहतील
भाजपचे संघटन पर्व सुरु आहे जे कोणी आमच्या सोबत येऊ इच्छितात त्यांना आम्ही जवळ करीत आहोत. मूळ विचारधारेपासून जो दूर जातो त्याला मतदार स्वीकारत नाहीत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे मूळ विचारापासून दूर गेले आहेत असेही दानवे म्हणाले. दरम्यान, मुंबईची महापालिका निवडणूक भारतीय जनता पक्ष जिंकणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बाप लेक दोघेच राहतील. त्याचं कारण संजय राऊत हे असेल असंही दानवे म्हणाले. 72 वेळेस काँग्रेसने घटना बदललेली आहे हे घटनेबद्दल बोलत आहेत असा टोला दानवेंनी काँग्रेसला लगावला.
महत्वाच्या बातम्या:
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

