एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुढच्या वर्षी बाप्पांचं आगमन लवकर, मुक्कामही बारा दिवस
मुंबई : गणपती बाप्पांचं आज विसर्जन होणार आहे. मात्र निरोप देताना बाप्पांनी भक्तांसाठी खुशखबर आणली आहे. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा 11 दिवस लवकर आगमन करणार आहेत.
2017 मध्ये शुक्रवारी 25 ऑगस्टला गणपतीचं आगमन होणार आहे, तर 5 सप्टेंबरला अनंत चतुदर्शी असेल. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पांचा मुक्काम बारा दिवसांचा असणार आहे.
पुढच्या वर्षी जेष्ठा गौरींचे आगमन पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवार 29 ऑगस्ट रोजी होणार असून गौरी गणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी म्हणजे गुरुवार 31 ऑगस्ट रोजी होणार आहे. बाराव्या दिवशी म्हणजे मंगळवारी 5 सप्टेंबर रोजी अनंतचतुर्दशी असल्याने बाप्पांचा मुक्काम बारा दिवसांचा असणार आहे.
पुढील ९ वर्षांची बाप्पांच्या आगमनाची तारीख :
2017- ऑगस्ट 25
2018- सप्टेंबर 13
2019- सप्टेंबर 2
2020- ऑगस्ट 22
2021- सप्टेंबर 10
2022- ऑगस्ट 31
2023- सप्टेंबर 19
2024- सप्टेंबर 7
2025- ऑगस्ट 27
LIVE: दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आज बाप्पाचं विसर्जन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement