एक्स्प्लोर

Gail Omvedt : डॉ. गेल ऑम्व्हेट यांचं निधन, अमेरिकेतून येऊन भारतात केलं मोठं काम 

Gail Omvedt Death : चळवळीमध्ये पायाला भिंगरी लावून झपाटल्यासारखे काम करणाऱ्या विचारवंत, कार्यकर्त्या गेल ऑम्व्हेट यांचे आज रोजी वयाच्या 81  व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

Gail Omvedt Death : स्त्री मुक्ती चळवळ, परित्यक्ता स्त्रियांची चळवळ, आदिवासी चळवळींमध्ये पायाला भिंगरी लावून झपाटल्यासारखे काम करणाऱ्या विचारवंत, कार्यकर्त्या गेल ऑम्व्हेट यांचे आज रोजी वयाच्या 81  व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व  स्त्री-मुक्तीवादी विचारांची,  संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणण्यात गेल ऑम्व्हेट यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 10 वाजता कासेगावला  क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
    
डॉ. गेल यांना लॉकडाऊन नंतर हळूहळू चालता येत नसल्यामुळे कासेगाव येथे घरीच डॉ. भारत पाटणकर यांच्या देखरेखेखाली वैद्यकीय उपचार घेत होत्या. डॉ. गेल या मूळच्या जन्माने अमेरिकेच्या असल्या तरी त्या तिथे विद्यार्थीदशेपासूनच वेगवेगळ्या चळवळीमध्ये सक्रिय होत्या. अमेरिकेच्या साम्राज्यवादी युद्धखोर प्रवृत्तीविरोधी उभा राहिलेल्या तरुणाईच्या  चळवळीत त्या अग्रस्थानी होत्या. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्या भारतात आल्या.

इथं वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास करत असताना त्या महाराष्ट्रात आल्या आणि महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षाला आपलेसे केले. पुढे महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी वसाहतीक समाजातील सांस्कृतिक बंड (नॉन ब्राम्हीण मूहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया ) हा आपला पीएचडी प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बरकली विद्यापीठात सादर करून त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली. 

त्यांच्यापूर्वी महात्मा फुले यांच्या चळवळीवर भारतातील कुणीही इतका सविस्तर अभ्यास करून  महाराष्ट्रभर फिरून मांडणी केली नव्हती. त्यांचा हा प्रबंध भारतातच नव्हे तर जगभरात अभ्यासकांना मैलाचा दगड ठरला आहे. त्यांच्या या पुस्तकामुळे फुलेंची चळवळ पुन्हा नव्याने अधोरेखित झाली.  इतकेच नव्हे या पुस्तकामुळेच प्रभावित होऊन बहुजन समाज पार्टीचे संस्थापक दिवंगत कांशीराम कासेगाव येथे येऊन त्यांचे मार्गदर्शन व सल्ला घेत असत.  

डॉ. गेल या अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राच्या मोहात न अडकता भारतात विशेषतः महाराष्ट्रात राहण्याचा निर्णय घेतला. स्त्री-मुक्ती  चळवळींचा अभ्यास करत असतानाच क्रांतीविरांगना इंदूताई पाटणकर यांची भेट झाली. आणि एमडी चे शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ चळवळीत काम करण्याचा निर्णय घेतलेल्या डॉ. भारत पाटणकर यांना आपला जीवनसाथी म्हणून निवडले आणि त्यांचा वादळी प्रवास सुरु झाला. प्रगत राष्ट्राचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारले.  

डॉ. गेल यांची पंचवीस पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित असून त्यामध्ये प्रामुख्याने कल्चरल रीवोल्ट इन कोलोनियल सोसायटी- द नॉन ब्राम्हीण मुहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, दलित अँड द डेमॉक्रॅटिक रिव्ह्यूलेशन, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, न्यू सोशल मुमेन्ट इन इंडिया यांचा समावेश आहे. 

गेल ऑम्व्हेट यांना त्यांच्या कार्यामुळं एबीपी माझाच्या माझा सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Loksabha Election : ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
Sharad Pawar Collar Video :उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
Bachchu Kadu on Amravati : आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंनी शड्डू ठोकला
आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंचा निर्धार
Ram Satpute : यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 4 PM : 29 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDinesh Bub : ठाकरे गटाच्या दिनेश बुब यांचा प्रहारमध्ये प्रवेश, राजकुमार पटेल यांच्याकडून उमेदवारीBJP Nashik Loksabha Constituency : नाशिकच्या जागेवरून भाजप पुन्हा आक्रमकSharad Pawar Collar Video :उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Loksabha Election : ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
Sharad Pawar Collar Video :उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
Bachchu Kadu on Amravati : आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंनी शड्डू ठोकला
आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंचा निर्धार
Ram Satpute : यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
RCB Vs KKR Dream11 Prediction:  कोहली, रसेल, मॅक्सवेल, आज तगडी फौज; पाहा परफेक्ट 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल
कोहली, रसेल, मॅक्सवेल, आज तगडी फौज; पाहा परफेक्ट 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल
Deepti Naval Life Story : दोन वर्षातच काडीमोड, प्रियकराचा कर्करोगानं मृत्यू; डिप्रेशनही वाट्याला आलं, अभिनेत्रीची हृदय पिळवटणारी कहाणी
दोन वर्षातच काडीमोड, प्रियकराचा कर्करोगानं मृत्यू; डिप्रेशनही वाट्याला आलं, अभिनेत्रीची हृदय पिळवटणारी कहाणी
Sanjay Mandlik : मदत करून पाच वर्षात फोन उचलले नाहीत, मुश्रीफ आणि मंडलिक आता तुम्ही जुने मित्र विसरा; भाजप कार्यकर्त्यांचा इशारा
मदत करून पाच वर्षात फोन उचलले नाहीत, मुश्रीफ आणि मंडलिक आता तुम्ही जुने मित्र विसरा; भाजप कार्यकर्त्यांचा इशारा
Amol Kolhe On Govinda Ahuja :  गोविंदा चालतो, पण महाराजांची भूमिका करणाऱ्यांना का हिणवले जाते? अमोल कोल्हेंचा सवाल
Amol Kolhe On Govinda Ahuja : गोविंदा चालतो, पण महाराजांची भूमिका करणाऱ्यांना का हिणवले जाते? अमोल कोल्हेंचा सवाल
Embed widget